Pune Dam Water Storage Latest Update:  Saam TV
मुंबई/पुणे

Pune Dam Water Storage: पुणेकरांसाठी गुडन्यूज, पाण्याची चिंता मिटली! चारही धरणांमधील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ; वाचा ताजी आकडेवारी

Pune Dam Water Storage Latest Update: पुण्यातील चार ही धरणे मिळून ८६.५१ टक्के इतका पाणीसाठा तयार झाला आहे. गेल्या वर्षी याच काळात ७४.१७ टक्के इतका पाणीसाठा होता.

Gangappa Pujari

अक्षय बडवे| ता. २९ जुलै २०२४

गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले आहे. काही आठवड्यांपासून पुणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे पुण्यातील चार ही धरणांमध्ये ८० टक्के पेक्षा अधिक पाणीसाठा तयार झाला आहे. त्यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पुणे, सातारा, सांगली कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये गेल्या चार दिवसांपासून धुवाँधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे पुणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये ८० टक्के पेक्षा आधिक पाणीसाठा तयार झाला आहे.

पुण्यातील चार ही धरणे मिळून ८६.५१ टक्के इतका पाणीसाठा तयार झाला आहे. गेल्या वर्षी याच काळात ७४.१७ टक्के इतका पाणीसाठा होता. पुणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य धरणांपैकी खडकवासला धरणात ८६.२४ टक्के, पानशेत धरणात ९४.९९ टक्के, वरसगाव धरणात८१. ४६ टक्के आणि टेमघर धरणात ८०. ०३ टक्के इतका पाणीसाठा आहे.

खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग

खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील पाणलोट क्षेत्रात संततधार कायम असल्याने आज सकाळी २२ हजार क्युसेक वेगाने मुठा नदीपात्रात पाणी सोडण्यात आलं आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधनता बाळगावी, असे आवाहन महापालिका आणि जलसंपदा विभागाकडून करण्यात आले आहे. पावसाच्या प्रमाणानुसार आणि येव्यानुसार विसर्ग कमी-जास्त होण्याची शक्यताही जलसंपदा विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Firecracker Blast : फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेकजण गंभीर जखमी

Bribe Case : नवी मुंबईत खळबळ; महापालिका मुख्यालयातच उपायुक्ताला लाच घेताना रंगेहाथ पकडलं

NalaSopara Tourism : 'नालासोपारा'जवळील ५ विरंगुळ्याची ठिकाणे, वीकेंडला करा लहान मुलांसोबत धमाल

'तुझी फिगर झिरो, गुढी पाडव्याला साडी खेचली, छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह व्यक्तव्य, TCS धर्मांतर प्रकरणातील पीडितेचा हादरवणारा जबाब

Maharashtra News Live Update: धुळे मनपा आयुक्तांचा आक्रमक पवित्रा, कर्तव्यात कसूर करणाऱ्या 16 कर्मचाऱ्यांचं निलंबन

SCROLL FOR NEXT