Ganesh Chaturthi 2023 Saam tv
मुंबई/पुणे

Ganesh Chaturthi 2023 : श्रीमंत दगडूशेठसमोर सामूहिक अथर्वशीर्ष पठण, ३५ हजार महिलांनी केली श्रीगणेशाची आराधना

Dagdusheth Ganapti 2023 Atharvashirsh Pathan : अथर्वशीर्ष पठणच्या कार्यक्रमात पाहुणे म्हणून रशियन नागरिकांनाही आमंत्रित करण्यात आले होते.

कोमल दामुद्रे

Pune Ganeshotsav 2023 :

सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम पाहायला मिळते. आज दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन होईल. अशातच पुण्यातही गणपतीचा मोठा उत्साह दिसून येत आहे. पुण्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर ३५ हजार महिलांनी अथर्वशीर्ष पठण केले आहे. यावेळी आदिशक्तीमध्ये मोठा उत्साह दिसून आला.

सकाळ वृत्तपत्र हातात घेऊन श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर अथर्वशीर्षाचे पठण करण्यात आले आहे. आज ऋषीपंचमीच्या दिवशी पहाटे श्रीमंत दगडूशेठसमोर महिलांनी अथर्वशीर्षाचे पठण करुन संपूर्ण परिसर मंत्रमुग्ध केला. पुण्यातील मानाचा गणपती म्हणून दगडूशेठ हलवाईची ओळख आहे. आज सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे ऋषिपंचमीनिमित्त पहाटे ३५ हजार महिलांनी मंडपासमोर अथर्वशीर्ष पठण केले. यासाठी महिलांनी पहाटेपासून रांगा लावल्या होत्या.

जमलेल्या समस्त स्त्रीवर्गाच्या (Women) हातात सकाळचे वृत्तपत्र देखील पाहायला मिळाले. तेथील मंडळ मागील ३५ वर्षांपासून सामूहिक अथर्वशीर्ष (Atharvashirsh) पठणाचा कार्यक्रम आयोजित करत आहेत. यामध्ये अनेक महिला मोठ्या उत्साहात कित्येक वर्षापासून अथर्वशीर्ष पठणसाठी हजेरी लावतात.

तसेच महिलांनी पहाटेपासूनच श्रीगणेशाच्या (Ganesh) नामाचा जयघोष सुरु केला. सकाळी सकाळी वातावरणात निर्माण झाली सकारात्मकाता पाहून भाविकांमध्ये देखील जल्लोष पाहायाला मिळत आहे. तसेच श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरातील वातावरण अगदी प्रसन्न झाल्याचे दिसून आले. अथर्वशीर्ष पठणाचे यंदा ३६ वे वर्ष आहे. पारंपारिक वेशभूषेत यंदा महिलांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. तसेच अथर्वशीर्ष पठणच्या कार्यक्रमात पाहुणे म्हणून रशियन नागरिकांनाही आमंत्रित करण्यात आले होते. तसेच यामध्येही 35 हजार महिलांचा यामध्ये समावेश होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा वापर केला; ते युज अँड थ्रो करणारे, मेळाव्यानंतर भाजप नेत्याची जळजळीत टीका

Actress Father Death: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर गोळीबार, रूग्णालयात येत धाडधाड गोळ्या झाडल्या; प्रकृती चिंताजनक

Aaditya & Amit Thackeray Emotional Hug: हातात हात धरून मंचावर आले,गळाभेट केली; अमित अन् आदित्य ठाकरेंचा तो VIDEO

Panvel Tourism : लोणावळा खंडाळा कशाला? पनवेलमध्येच पाहा मनाला भुरळ घालणारा अडाई धबधबा

Amit and Aaditya Thackeray: ठाकरेंची तिसरी पिढी राजकरणात; अमित अन् आदित्य ठाकरेंचे ते फोटो चर्चेत

SCROLL FOR NEXT