Pune Crime Saam tv
मुंबई/पुणे

Pune Crime: पुणे हादरले! भररस्त्यात हत्याकांडाचा थरार, डोक्यात दगड घालून तरुणाला जागीच संपवलं

Pune Youth Killed Case: पुण्यामध्ये तरुणाची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली. धनकवडी परिसरात ही घटना घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली.

Priya More
  • पुण्यातील धनकवडीमध्ये हत्याकांडाची भयंकर घटना

  • डोक्यात दगड घालून तरुणाला संपवलं

  • सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

  • पोलिसांनी आरोपीला अटक केली

सागर आव्हाड, पुणे

पुण्यामध्ये हत्याकांडाची भयंकर घटना घडली. एका तरुणाची भरस्त्यात डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या करण्यात आली. पुण्यातील धनकवडी भागात ही घटना घडली. आईवरून शिवी दिल्याच्या रागातून ही घटना घडली. या घटनेमुळेप पुण्यात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपीला बेड्या ठोकल्या. पोलिस सध्या या हत्याकांडाचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, धनकवडीत आईवरून शिवी दिल्याच्या रागातून एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. शंकर महाराज उड्डाण पुलाखाली ही घटना घडली. दोघे तरुण दारू पित बसले होते. यावेळी दोघांमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेला. या वेळी एका तरुणाने दुसऱ्या तरुणाला आईवरून शिवी दिली. याचाच राग आल्याने दुसऱ्या तरुणाने दगड डोक्यात घालून मित्राची हत्या केली.

मृत व्यक्तीचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह पाहून नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली तेव्हा हे हत्याकांड प्रकरण समोर आले. घटनेची माहिती मिळताच सहकारनगर पोलिसांनी काही तासांतच आरोपी किरण उर्फ बिट्या रवी वाघमारे (वय २४ वर्षे) याला अटक केली. आरोपी संभाजीनगरच्या शंकर वसाहत येथे राहतो. या घटनेप्रकरणी पोलिसांकडून आरोपीची चौकशी सुरू आहे.

आरोपीने हत्येची कबुली दिली. प्राथमिक तपासातून असे समोर आले की, आईवरून शिवीगाळ झाल्याच्या रागातून तरुणाची हत्या करण्यात आली. आरोपीविरुद्ध सहकारनगर पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पुढील तपास पोलिस निरीक्षक संतोष जाधव करत आहेत. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महायुतीत पुन्हा खदखद! शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा तडकफडकी राजीनामा; काहीवेळातच हाती घेतलं कमळ

राज ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वीच एकनाथ शिंदेंनी टाकला मोठा डाव; रायगडमध्ये मनसेला भगदाड,८ प्रमुख नेत्यांचा शिंदेसेनेत प्रवेश

Maharashtra News Live Update: "संजय राऊतांचे वय झाले, 'साठी बुद्धी नाठी': सातारा सांगलीचे विधान परिषद आमदार धैर्यशील कदम यांची टीका

देवेंद्र फडणवीसांकडे दैवी शक्ति, ते वयाच्या 27 व्या वर्षी...; चंद्रकांत पाटील हे काय बोलून गेले? VIDEO

SRA फ्लॅट मिळवून देण्याच्या आमिषाने लाटले ५.५७ कोटी; काँग्रेस खासदाराच्या पीएवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT