Police investigating the crime scene after a युवक was fatally attacked following a dispute during a wedding procession in Pune. saam tv
मुंबई/पुणे

लग्नाच्या वरातीत नाचण्यावरून झालेल्या वादाचा भयानक शेवट; तरुणाची धारदार शस्त्राने हत्या

Youth Killed Over Wedding Dance Dispute In Pune: पुण्यात लग्नाच्या वरातीत नाचण्यावरून झालेल्या वादातून तरुणाची धारदार शस्त्राने हत्या. भारती विद्यापीठ पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Omkar Sonawane

सचिन जाधव, साम टीव्ही

लग्नाच्या वरातीत नाचण्यावरून झालेल्या वादातून एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. तेजस दत्तात्रय पिलाने असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी वेगाने सूत्रे फिरवत चार आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, तेजस पिलाने आणि आरोपी विशाल खोपडे यांच्यात काही दिवसांपूर्वी एका लग्नाच्या वरातीत नाचण्यावरून जोरदार भांडण झाले होते. त्यावेळचा राग मनात धरून विशाल आणि त्याच्या साथीदारांनी तेजसचा काटा काढण्याचे ठरवले. या वादाचा सूड घेण्यासाठी आरोपीनी तेजसला गाठले आणि त्याच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तेजसचा जागीच मृत्यू झाला.

हत्येची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासाची चक्रे फिरवत पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी विशाल खोपडे याच्यासह अभिषेक खोपडे, सचिन धुळे आणि आदिनाथ कसबे या चौघांना अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Silent Heart Attack: या 6 व्यक्तींना सायलेंट हार्ट अटॅकचा धोका जास्त असतो?

Maharashtra News Live Update: भिमाशंकरच्या दुरवस्थेवर सुप्रिया सुळेंची टीका; मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार

Manoj Jarange : मोठी बातमी! एकनाथ शिंदें आज परभणी दौऱ्यावर, मनोज जरांगेंनी दिला इशारा

Bonus 2026 : दसऱ्याआधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट? ₹7,000 ऐवजी मिळणार ₹21,000

Chutneys for weight loss: काही केल्या पोटावरची चरबी जातच नाहीये? या 5 प्रकारच्या चटणी करतील तुमची मदत

SCROLL FOR NEXT