Pune Crime News  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime: पुण्यात चाललंय काय? तरुणीचे अपहरण करून विनयभंग, बोपदेव घाटातील दुसरी घटना

Pune Bopdev Ghat: पुण्यातील बोपदेव घाटामध्ये आणखी एका तरुणीसोबत धक्कादायक घटना घडली. अपहरण करून या तरुणीचा विनयभंग करण्यात आला.

Priya More

नितीन पाटणकर, पुणे

पुण्यामध्ये गुन्हेगारांना पोलिसांचा वचक राहिला नसल्याच्या एकापाठोपाठ एक घटना समोर येत आहेत. पुण्यामध्ये महिला सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पुण्यातील लाडक्या बहिणींवर अत्याचाराच्या घटना घडत आहेत. बोपदेव घाटामध्ये २१ वर्षीय तरूणीवर सामूहिक अत्याचाराची घटना ताजी असतानाच याच ठिकाणी आणखी एका तरूणीचे अपहरण करून तिचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे पुण्यामध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ३ दिवसांपूर्वी पुण्यातील बोपदेव घाटात तरुणीचा विनयभंग झाल्याची घटना घडली. ही तरुणी मित्रासोबत बोपदेव घाटात फिरायला केली होती. या तरुणीचे कारमधून अपहरण करून तिचा विनयभंग करण्यात आला. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

या तरुणीने कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तात्काळ मोटारचालक राजेखाँ करीम पठाण (३६ वर्षे) याला अटक करण्यात आली आहे. तक्रारदार तरुणी मित्रासोबत बोपदेव घाटात फिरायला गेली होती. त्यावेळी राजेखाँ करीम पठाण मोटारीतून तेथे आला. त्याने एका मानवाधिकार संघटनेचा कार्यकर्ता असल्याची बतावणी केली. या ठिकाणी जोडप्यांना बंदी आहे, असे सांगून त्याने तरुणी आणि तिच्याबरोबर असलेल्या मित्राचे मोबाइलमध्ये फोटो काढले.

तरुणीला धमकावून आरोपीने तिला कारमध्ये बसण्यास सांगितले. त्यानंतर हा कार कोंढव्यातील खडी मशीन चौकात नेली. तेथील एका गल्लीत कार थांबवून आरोपीने तरुणीचा विनयभंग केला. त्यानंतर तरुणीला खडी मशीन चौकात सोडून आरोपी राजेखाँ करीम पठाण पसार झाला. पीडित तरुणीने आरोपीविरोधात तक्रार केल्यानंतर हे प्रकरण समोर आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लोकलच्या डब्याला लागली आग; प्रवाशांची उडाली धावपळ, VIDEO

PAK vs NZ: सुपर-8 च्या पहिल्याच सामन्यात पावसाची फटकेबाजी; सामना रद्द, कोणत्या संघाच्या स्वप्नावर फेरलं पाणी?

Pune Crime: पुण्यातील रस्त्यांवर टोळक्यांची दहशत; १७ वर्षीय मुलावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला

मोठी अपडेट! दादांच्या विमानाचा पायलट वैफल्यग्रस्त? पवारांचा दिल्लीतून नवा बॉम्ब

अलिबागच्या समुद्रात उलटली प्रवासी बोट? कुणी लपवला अपघाताचा व्हिडिओ?

SCROLL FOR NEXT