मुंबई/पुणे

Pune Crime: प्रियकराने लग्नाला नकार दिल्याने तरुणीने संपवलं आयुष्य, इमारतीवरडून घेतली उडी

Pune Crime: प्रियकराने लग्नाला नकार दिल्याने 22 वर्षीय तरुणीने चार मजली इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना दौड तालुक्यात घडली आहे.

Prachee kulkarni

Pune Crime: प्रियकराने लग्नाला नकार दिल्याने 22 वर्षीय तरुणीने चार मजली इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना दौड तालुक्यात घडली आहे. दौंड पोलिसांनी याप्रकरणी प्रियकराविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत दौंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साक्षी मोरोपंत गायकवाड असे आत्महत्या केलेल्या २२ वर्षीय तरुणीचं नाव आहे. साक्षी दौंड येथील लाल चर्च मार्गावरील स्वप्नयोग अपार्टमेंटमध्ये राहत होती. तसेच शहरातील एका खासगी रूग्णालयातील पॅथोलॅाजी लॅबमध्ये ती नोकरी करत होती.

शहरातीलच कुरकुंभ रोड येथील मोरे वस्ती येथे राहणाऱ्या निखिल साबळे या तरुणासोबत तिचे प्रेमसंबंध होते. साक्षीने त्याच्याकडे लग्नासाठी अग्रह धरला होता, परंतु त्याने लग्न करण्यास नकार दिला. यामुळे साक्षी तणावात होती. (Latest Marathi News)

या दरम्यान ११ मार्च रोजी साक्षीने याबाबत तिचा भाऊ कौशल गायकवाड याला माहिती दिली. कौशलने तिची समजूत देखील काढली होती. परंतु घरातील सर्व सदस्य झोपी गेल्यानंतर तिने इमरातीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.

याप्रकरणी साक्षीचा भाऊ कौशल गायकवाड याने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. कौशलने दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी निखिल साबळे या तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस या प्रकरणाचा वेगवेगळ्या शक्यतांच्या आधारे तपास करत आहेत. उप निरीक्षक सुनीता चवरे या या प्रकरणाचा तपास करत आहेत. (Pune News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्याला नवीन मेडिकल कॉलेज मिळालं - देवेंद्र फडणवीस

UP Elections: विधानसभाआधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा धुरळा उडणार; हायकोर्टाचे 3 महिन्यांत निवडणुका घेण्याचे निर्देश

IAS Officer Transfer: मोठा प्रशासकीय फेरबदल! २३ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; ११ जिल्ह्यांना मिळाले नवे कलेक्टर

Breast cancer: कोणत्याही प्रकारची वेदना न होणंही धोक्याचं; ब्रेस्ट कॅन्सरच्या या लक्षणांकडे दुर्लक्ष नकोच!

15 कोटींचे मोबाइल दुसऱ्या वाहनात भरले अन् पोल्ट्री फार्ममध्ये लपवले; दिल्लीहून पुण्याला जाताना मालेगावमध्ये घडला चोरीचा थरार

SCROLL FOR NEXT