sassoon hospital pune news  saam tv
मुंबई/पुणे

Pune Crime : पुण्यात अत्याचार झालेल्या 'त्या' तरुणीची ससूनमध्ये वैद्यकीय चाचणी, संध्याकाळी रिपोर्ट मिळणार

Pune news : पुण्यातल्या स्वारगेट बस डेपोमध्ये पहाटे साडेपाचच्या सुमारास एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाला. ही तरुणी सध्या ससून रुग्णालयात असून तिची वैद्यकीय तपासणी पूर्ण झाल्याची माहिती समोर आली आहे.

Yash Shirke

नितीन पाटणकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

Pune Crime News : पुण्यातील स्वारगेट बस डेपोमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पहाटे साडेपाचच्या सुमारास स्वारगेट एसटी स्टँडमध्ये उभ्या असलेल्या बसमध्ये या तरुणीवर बलात्कार झाला. याप्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल करत आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान पिडीत तरुणीला ससून रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.

पुण्यातल्या स्वारगेटमध्ये झालेल्या प्रकरणानंतर पीडित तरुणीला ससून रुग्णालयात वैद्यकीय चाचणी करण्यासाठी पाठवण्यात आले होते. पीडितेची वैद्यकीय चाचणी झाल्याची माहिती समोर आली आहे. या चाचणीचा रिपोर्ट संध्याकाळ पर्यंत येणार असल्याचे म्हटले जात आहे. चाचणी झाल्यानंतर ससून रुग्णालयामध्ये पीडितेला ॲडमिट करण्यात आले आहे.

संध्याकाळी पीडित तरुणीला ससून रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. त्याचदरम्यान वैद्यकीय अहवालदेखील येणार असल्याचे म्हटले जात आहे. वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर पोलिसांच्या कारवाईला वेग येईल. दरम्यान या प्रकरणातील फरार आरोपी दत्तात्रय गाडेला शोधण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरु आहेत.

पुणे स्वारगेट एसटी डेपो बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेचा फोटो समोर आला आहे. फरार आरोपीच्या मागावर पोलिसांचे ८ पथक आहे. आरोपीवर पुण्यातल्या स्वारगेट पोलीस स्थानकामध्ये चोरीचा गुन्हा दाखल आहे. त्याच्यावर ग्रामीण भागात अधिक गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी आरोपीच्या घरावर छापा मारुन त्याच्या भावाला ताब्यात घेतले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Extramarital Affair : अमेरिकेत पत्नीची हत्या, भारतातील गर्लफ्रेंडला फोटो; उच्चशिक्षित इंजिनिअरचं भयानक कृत्य

Smartphone Care Tips : फोनच्या स्क्रीनवर Liquid Detected चा इशारा येतो? मग टाळा या ७ चुका

Maharashtra News Live Update: पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या ताफ्याला रस्त्यावर पडलेल्या खड्यांचा बसला फटका

शोल्डर बॅग्सच्या 5 लेटेस्ट डिझाईन्स; प्रत्येक आउटफिटला देतील स्टायलिश लूक

आदिवासी महिलेसोबत सामूहिक बलात्कार; नवऱ्याला शोधायला गेली अन् शेतात सापडला मृतदेह

SCROLL FOR NEXT