ST Bus Driver and Conductor Brutally Beaten  Saam Tv News
मुंबई/पुणे

Pune Crime : दगड मारला, कॉलर पकडून बसच्या पायरीत दाबलं, पुण्यात बसचालक-वाहकाला बेदम मारहाण; VIDEO

ST Bus Driver and Conductor Brutally Beaten : मारहाणीचं कारण अद्याप अस्पष्ट असून, बसमध्ये ४३ प्रवासी असताना ही गाडी थांबवली आणि बसच्या खाली उतरुन ही हाणामारी झाल्याचं पाहायला मिळालं आहे.

Prashant Patil

पुणे : पुण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातल्या खडकीजवळच्या एसटी बस चालकाला आणि वाहकाला बेदम मारहाण केली असल्याचं समोर आलंय. तसंच बसवर आणि त्यांच्यावर दगडफेक देखील केल्याचं पुढे आलं आहे. मारहाणीचं कारण अद्याप अस्पष्ट असून, बसमध्ये ४३ प्रवासी असताना ही गाडी थांबवली आणि बसच्या खाली उतरुन ही हाणामारी झाल्याचं पाहायला मिळालं आहे. अहमदपूर ते मुंबई या गाडीतील चाकल आणि वाहकाला मारहाण करण्यात आलं असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, या मारहाणीचा व्हिडिओ सध्या प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे.

पुण्यातील 'या' कॉलेजमध्ये शिक्षकाचा रात्रीस खेळ चाले

दरम्यान, इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षीचा गणिताचा पेपर हा सर्व विद्यार्थ्यांचा अवघड विषय. हा गणिताचा पेपर पास करून देण्यासाठी पुण्यातील वाघोली भागात असलेल्या पार्वतीबाई गेनबा मोझे या महाविद्यालयातील एका प्रोफेसरने विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने कारवाई करत या प्रोफेसरसह चौघांना बेड्या ठोकल्या आहेत. प्राध्यापक प्रतिक किसन सातव यासह आदित्य खिलारे, अमोल नागरगोजे आणि अनिकेत रोडे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, प्राध्यापक सातव हा कॉलेजमध्ये दुपारी झालेला पहिल्या वर्षांचा इंजिनियरींगचा गणिताचा पेपर रात्री कॉलेजमध्ये इंजिनीयरींगचे शिक्षण घेत असलेल्या विदयार्थ्यांना पुन्हा लिहिण्यासाठी देत होता.

आरोपीकडून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे गणित २ या विषयाचे लिहिलेले उत्तरपत्रिकेचे ६ बंडल तसेच रोख रक्कम २ लाख ६ हजार रुपये आणि उत्तरपत्रिका ठेवण्यात आलेल्या कंट्रोल रूमची चावी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गणित २ या विषयामध्ये नापास होण्याची भिती वाटते अशा विद्यार्थ्यांना हेरून त्यांच्याकडून स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी संगनमत करुन १० ते ५० हजार रुपये घ्यायचा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Aus Semifinal: शाब्बास पोरींनो! भारताच्या लेकींनी मैदान गाजवलं, ऑस्ट्रेलियाला नमवत फायनलमध्ये दणक्यात एन्ट्री

WC Semifinal: मानधनाच्या विकेटवर भरमैदानात राडा; थर्ड अंपायरच्या निर्णयानं फलंदाजासह ग्राउंड रेफरीही बुचकळ्यात

Maharashtra Opposition Unity : मतदारयाद्यांचा घोळ, निवडणुकीला विरोध? 'सत्याचा मोर्चा'साठी विरोधक एकवटले, VIDEO

रुपाली चाकणकराचं अध्यक्षपद धोक्यात?डॉक्टरचा सीडीआर जाहीर करणं भोवणार?

Jio: धमाकेदार ऑफर, युजर्सला थेट ३५ हजाराचा फायदा, जिओची अनोखी स्किम

SCROLL FOR NEXT