Pune Crime saam tv
मुंबई/पुणे

9 वर्षाच्या चिमुरड्याच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून खून! पिंपरी धक्कादायक घटना

चिखलीत (Chikhali) 9 वर्षीय मुलाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून खून (Murder) करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला

गोपाळ मोटघरे

पिंपरी चिंचवड : चिखलीत (Chikhali) 9 वर्षीय मुलाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून खून (Murder) करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. रात्रीच्या सुमारास ही धक्कादायक घटना समोर आली आहे. 9 वर्षीय मुलाच्या पालकांनी चिखली पोलिसात (Police) तो बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. लक्ष्मण देवासी असे 9 वर्षीय मुलाचे नाव आहे. रविवारी दुपारपासून तो बेपत्ता झाला होता. त्याचा आई- वडिलांनी शोध घेतला, पण तो सापडला नाही.

हे देखील पहा-

अखेर चिखली पोलीस (Police) ठाणे गाठून रात्री ७ वाजेच्या सुमारास तो बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. पोलीस आणि कुटुंबीय त्याचा शोध घेत होते. तेव्हा त्याच्या घराच्या शंभर मीटर अंतरावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या लक्ष्मणचा मृतदेह आढळला. त्याचा अज्ञात व्यक्तीने सिमेंटचा गट्टू घालून खून केला असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, याप्रकरणी चिखली पोलीस अधिक तपास करत असून खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 9 वर्षीय मुलगा काल अचानक गायब झाला. आई- वडिलांनी जवळ सर्वत्र शोध घेतला आहे. मात्र, सापडून आला नाही. शेवटी तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार शोध घेतला असता या मुलाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात घराच्या जवळच पडलेला आढळून आला. अज्ञात व्यक्तीने हा प्रकार केल्याचे प्रथमदर्शनी दिसत असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress : प्रसिद्ध अभिनेत्रीवर कोसळला दु:खाचा डोंगर; वडिलांचे निधन, भावुक पोस्ट शेअर

Cholesterol Test: फक्त कोलेस्ट्रॉल नॉर्मल आहे म्हणून निर्धास्त आहात? हार्ट अटॅकचा खरा धोका सांगणारा हा 1 आकडा नक्की तपासा

Accident News : मुंबई -गोवा महामार्गावर भयंकर अपघात, भरधाव कारची डंपरला धडक; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: समाज आक्रमक, जिल्हाभर काढण्यात येणार मोर्चा

Mumbai News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'या' ठिकाणच्या झोपडपट्ट्यांचा होणार पुनर्विकास, ८५००० नागरिकांना मिळणार बिल्डिंगमध्ये घर

SCROLL FOR NEXT