Pune Crime News Saam TV News
मुंबई/पुणे

Pune : संतापजनक! स्वच्छतागृहात चिमुरडीवर लैंगिक अत्याचार, शेजाऱ्याने मर्यादा ओलांडल्या

Kondhwa Pune Crime News Update: पुण्यातून संतापजनक घटना समोर आली आहे. शेजारी राहणाऱ्या मुलाने ९ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Namdeo Kumbhar

अक्षय बडवे, पुणे प्रतिनिधी

पुण्यातील कोंढवा परिसरात एक धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे. घराजवळ राहणाऱ्या एका अल्पवयीन तरुणाने नऊ वर्षीय चिमुरडीवर स्वच्छतागृहात लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी अल्पवयीन तरुणाविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. ही घटना परिसरात खळबळ माजवणारी ठरली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि आरोपी हे एकाच परिसरात राहतात. ही घटना ३ मे रोजी रात्री १० वाजता घडली. पीडित चिमुरडी रात्री स्वच्छतागृहात गेली होती. यावेळी आरोपीने देखील तिच्या मागोमाग प्रवेश करत दरवाजा लावून घेतला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. जबरदस्ती केल्यानंतर कुणालाही सांगितल्यास ठार मारण्याची धमकी या आरोपीने पीडित मुलीला दिली.

मात्र घरी गेल्यानंतर पोट दुखू लागल्याने पीडित मुलीने आईला सगळा प्रकार सांगितला. त्यानंतर पीडितेच्या आईने तिच्या अंगावरून कपडे काढून पाहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पिडीतेच्या आईने कोंढवा पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. कोंढवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rajya Sabha Election: मोठी बातमी! राज्यसभेसाठी भाजपकडून ८ उमेदवारांच्या नावाची घोषणा, कुणाला दिली संधी?

Maharashtra News Live Update: नंदुरबार रेल्वे स्थानकावर सुरक्षा यंत्रणांची रंगीत तालीम; बेवारस बॅगची श्वान पथकाकडून तपासणी

अभिजीत दीपके अन् आशुतोष रांका यांना अटक होणार; ट्विटने खळबळ

Chanakya Niti: लग्नाआधी जोडीदार निवडताना या 7 गोष्टी नक्की तपासा; नाहीतर नंतर पश्चात्ताप होऊ शकतो

Kitchen Safety Tips: गॅस- स्टोव्हच्या जवळ 6 वस्तू ठेवणे टाळा, वास्तुशास्तानुसार ठरू शकते घातक

SCROLL FOR NEXT