Pune News Update SAAM TV
मुंबई/पुणे

संतापजनक! पुण्यात खासगी बस चालकाकडून प्रवासी महिलेवर बलात्कार

याप्रकरणी 21 वर्षीय महिलेने स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

साम टिव्ही ब्युरो

पुणे : राज्यात महिला अत्याचारांच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे महिला अत्याचाराविरोधात सरकारने कठोर पाऊले उचलावीत अशी मागणी नागरिक करताहेत. अशातच पुण्यातून (Pune) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील कात्रजमध्ये खासगी बस चालकाने प्रवासी महिलेचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही संतापजनक घटना शुक्रवारी (10 जून) रात्रीच्या सुमारास घडली. (Pune Latest Crime News)

याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी आरोपी बसचालकाच्या मुसक्या आवळल्या आहे. नवनाथ शिवाजी भोंग (38) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 21 वर्षीय महिलेने स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला वाशीम जिल्ह्यातील रहिवाशी असून ती गुरूवारी एका खासगी बसने आपल्या पतीसोबत पुण्यात आली होती. रात्री पुण्यात आल्यानंतर दोघेही राहण्यासाठी खोली शोधत होते. मात्र, रात्री उशीर झाल्यामुळे खासगी बस चालकाने या दाम्पत्याला ट्रॅव्हल्समध्येच झोपण्यास सांगितले. दोघेही नवीन असल्याने त्यांनी ट्रॅव्हल्समध्ये झोपण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर काही वेळाने महिलेचे पती लघुशंकेसाठी गेले.

दरम्यान, महिलेचे पती लघुशंकेसाठी गेल्याचे बघताच, महिलेवर लक्ष ठेवून असलेल्या आरोपी नवनाथ याची नियत फिरली. त्याने अचानक गाडी सुरू केली आणि महिलेचे अपहरण केले. त्यानंतर स्वारगेट बस स्थानकाच्या परिसरात फुटपाथवर या महिलेला नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. तर पुन्हा बस कात्रज परिसरात नेली आणि तेथील फुटपाथवर दुसऱ्यांदा बलात्कार केला. दरम्यान महिलेचा तिला शोधत होता. पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत चालकाला अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: गणेशोत्सवासाठी रत्नागिरी जिल्ह्यातून २,५०० जादा एसटी बस , ४०० गाड्या फुल

Success Story: युट्यूब आणि Google वरुन अभ्यास; क्रॅक केली स्पर्धा परीक्षा; पहाडिया समाजातील लेक होणार प्रशासकीय अधिकारी

Wednesday Horoscope : पार्टनरसाठी पैसा खर्च करावा लागणार; प्रेमात वाद होणार; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध

Saturn Jupiter yog: 48 तासांनंतर पलटणार 'या' राशींचं नशीब; शनी-गुरु तयार करणार शतांक योग, मिळणार फक्त पैसा

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

SCROLL FOR NEXT