Pune Crime News Saam tv
मुंबई/पुणे

Pune Crime News: पुणे स्टेशन परिसरात डोक्यात दगड घालून तरुणाच्या खून

पुणे स्टेशन परिसरात डोक्यात दगड घालून तरुणाच्या खून

साम टिव्ही ब्युरो

अक्षय बडवे

पुणे : पुणे रेल्‍वे स्‍टेशन परिसरात डोक्‍यात दगड टाकून तरूणाचा खून झाल्‍याची घटना समोर आली आहे. खून झालेल्या (Pune) व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही. मात्र खून झालेला हा व्यक्ती फिरस्ता असल्याचा पोलिसांचा (Police) अंदाज आहे. (Live Marathi News)

पुणे रेल्वे स्टेशन भागात मालधक्का परिसरात मारुती मंदिराजवळ एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तरुणाच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून करण्यात आल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले. तरुणाची (Pune Crime News) ओळख पटू नये म्हणून चेहरा दगडाने ठेचून विद्रुप करण्यात आला होता.

पोलिसांकडून तपास सुरू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खून झालेल्या व्यक्तीचे वय अंदाजे ३० ते ३५ वर्ष असण्याची शक्यता आहे. तो फिरस्ता असल्याचा संशय पोलिसांना आहे. तोंडावर दगड मारल्‍याने ओळख पटत नसून याबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today : सोने चांदीचे दर घसरले! तब्बल २७,००० रुपयांनी सोनं स्वस्त; चांदीचा भाव काय? जाणून घ्या ताजे दर

High blood pressure: तरुण वयातच वाढतोय रक्तदाब? डॉक्टरांनी सांगितलं रोजच्या सवयींमधील सर्वात मोठं कारण

पहिला पाऊस पडल्यानंतर शेतकरी आनंदी का होतो? |why farmers are happy after rain

Maharashtra News Live Update: पुणे जिल्हा सत्र न्यायालयात आज नसरापूर प्रकरणाचा निकाल

नादाला लागू नका, मी ५ लोकांना ठार केले; संजय पाटलांची उघड धमकी? ठाकरेंच्या खासदाराच्या आरोपाने उडाली खळबळ

SCROLL FOR NEXT