Pune Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime News : पुण्यात मध्यरात्रीचा थरार! सिमेंट ब्लॉक डोक्यात घातला, सराईत गुन्हेगारांनी केला तरुणाचा खून

Pune City News : पुण्याच्या कोंढवा परिसरात मध्यरात्री एका तरुणाची हत्या करण्यात आली. डोक्यात काठी आणि सिमेंट ब्लॉक मारुन तरुणाचा खून केला गेला. या प्रकरणी पोलिसांनी दोन सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेतले आहे.

Yash Shirke

Pune Crime News : पुण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील कोंढवा परिसरात मध्यरात्री साडेतीन वाजता एका तरुणाचा खून करण्यात आला आहे. मारहाण करुन मग तरुणाची हत्या केली असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवला जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक देखील केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दशक्रिया विधी भैरवनाथ मंदिरासमोर तरुणाची हत्या करण्यात आली आहे. हल्लेखोरांनी प्रथम तरुणाला मारहाण केली. त्यानंतर त्याच्या डोक्यात काठी आणि सिमेंट ब्लॉक मारला. यात डोक्याला जबर मार लागल्याने तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना मध्यरात्री साडेतीन वाजता घडली.

मृत तरुणाचे नाव मल्लेश कोळी असे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तो आर. के. कॉलनी, गोकुळनगर, कोंढवा येथे राहत होता. या तरुणाची हत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यांनी हल्लेखोरांना शोधायला सुरुवात केली. दरम्यान पोलिसांनी दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

मागील काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाणात वाढ होत आहे. त्यातही तरुणांकडून होणाऱ्या हिंसेचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. रात्री-अपरात्री कोयता घेऊन फिरणाऱ्या कोयता गँगमुळेही पुणेकर त्रस्त झाले आहेत. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पुण्यातील पोलीस यंत्रणा अधिक सक्रीय झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Maharashtra Politics : फडणवीस-शिंदे असते तर गुंगा गुड्डा म्हटले असते, राऊतांच्या वक्तव्याने वाद उफळणार?

Morning Exercise: सकाळी उठताच फक्त ५ मिनिटे करा 'हे' व्यायाम; दिवसभर राहाल उत्साही आणि फ्रेश

Eknath Shinde : सिद्धिविनायक मंदिर देणगी घोटाळा प्रकरणात एकनाथ शिंदेंचे तातडीचे आदेश, ठाकरे सेना अडचणीत येणार?

Rohit Sharma: रोहित शर्मा स्वतःहून निवृत्ती घेणार नाही; मोहम्मद कैफच्या वक्तव्याने रंगली नवी चर्चा

SCROLL FOR NEXT