Pune Vandalized Vehicle Incident Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime News : हाती हत्यार आणि तोंडात गुंडाचे नाव, पुण्यात वाहनांच्या तोडफोडीचे सत्र सुरूच

Pune Vandalized Vehicle Video : पुण्यातील येरवडा परिसरात रात्रीच्या वेळी काही तरुणांनी गोंधळ करायला सुरुवात केली. मोठ्याने ओरडत ते खासगी वाहनांची तोडफोड करु लागले. ही घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे.

Yash Shirke

Pune Crime News : पुण्यातील धानोरी भागात दोन दिवसांपूर्वी काही अज्ञातांनी तोडफोड केली होती. ही घटना ताजी असताना आज पुन्हा येरवडा परिसरातून वाहनांची तोडफोड झाल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यात खासगी मालमत्तेची तोडफोड करुन दहशत पसरवण्याता प्रयत्न केला जात आहे. या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पुण्यातील वाहनांच्या तोडफोडीचे सत्र सुरुच आहे. येरवडा परिसरात दहशत पसरवण्यासाठी हत्यारांनी तोडफोड केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. गुंडाचे नाव घेऊन लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास करायला सुरुवात केली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याच्या येरवडामध्ये काही तरुणांनी रात्री अचानक हातात हत्यार घेऊन वाहनांची नासधूस करायला सुरुवात केली. हे तरुण 'भावाचा विचार कर, आम्ही गुड्या कसबे आहेत.. कोण गुड्या कसबे' असे म्हणत रस्त्यावरुन फिरत होते. या तरुणांनी रस्त्यावरील खासगी वाहनांची तोडफोड केल्याचे व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसते.

पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. दिवसेंदिवस खासगी मालमत्तेची तोडफोड करणे, जाळपोळ करणे असे प्रकार घडत आहेत. अशा कृत्यांमुळे आपण दहशत पसरवतो असे गुंड प्रवृत्तीच्या लोकांना वाटते. यामुळे स्थानिक नागरिकांच्या मनात भीती वाढत आहे. एकूणच पुण्यामध्ये सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे असे लोक म्हणत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kunbi caste certificate : मोठी बातमी! कुणबी जातीचा दाखलाच रद्द; महिलेचं नगरसेवकपद गेलं, राज्याच्या राजकारणात खळबळ

Kombdi Vade Recipe : गटारी स्पेशल मेजवानी! मालवणी कोंबडी वड्यांची रेसिपी, चव अशी की घरचे बोटं चाटत राहतील

Abhijeet Dipke : अभिजित दिपके राजकीय पक्ष स्थापन करणार? पत्रकार परिषदेत स्पष्टच सांगितलं

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Lizard : या ५ ट्रिक्स वापरा; घरातील पाली होतील कायमच्या गायब!

SCROLL FOR NEXT