Pune Ambegaon Women Murder Saam Tv News
मुंबई/पुणे

Pune Crime : १०० CCTV, १२०० रिक्षांची तपासणी, पुण्यातील 'त्या' मर्डर मिस्ट्रीचं कोडं सुटलं; शहरातील धक्कादायक प्रकरण

Pune Ambegaon Women Murder : पुण्यातील आंबेगाव परिसरात २० मे रोजी झालेल्या महिलेच्या हत्येचा उलगडा अखेर झाला आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी उत्तर प्रदेशमध्ये जाऊन आरोपीला अटक केली आहे.

Prashant Patil

अक्षय बडवे, साम टिव्ही

पुणे : पुण्यातील आंबेगाव परिसरात २० मे रोजी झालेल्या महिलेच्या हत्येचा उलगडा अखेर झाला आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी उत्तर प्रदेशमध्ये जाऊन आरोपीला अटक केली आहे. शाहरुख मन्सूर असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. २० मे रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास आंबेगाव परिसरात एका महिलेची हत्या झाली होती. १०० सीसीटीव्ही, १२०० रिक्षांची पाहणी करुन या मर्डर मिस्ट्रीचं कोडं अखेर सुटलंय.

पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, २० मे रोजी आंबेगाव भागात एका महिलेच्या डोक्यामध्ये कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरुन धारधार हत्याराने वार करुन तिचा खून केला होता. मृत महिलेच्या मोबाईल नंबरचे तांत्रिक विश्लेषण करुन पोलिसांनी कोल्हेवाडी ते नवले पुलापर्यंचे सुमारे १०० ठिकाणचे सीसीटीव्ही तपासले गेले. दरम्यान, ही महिला एका दुचाकीवरुन बसून नवले पुलावर आल्याचं दिसून आले आणि तिथून ती एका रिक्षात बसल्याचं कॅमेरामधून निष्पन्न झालं. रिक्षाचा शोध घेण्यासाठी पुणे आरटीओकडून टी.व्ही.एस कंपनीच्या रजिस्टर असलेल्या १२०० रिक्षांची माहिती घेऊन ती महिला ज्या रिक्षाने गेली त्याची माहिती जुळवली.

या रिक्षाचा शोध घेऊन त्याचा मालक शाहरुख शकील मन्सूरने महिलेची हत्या केल्याचं निष्पन्न झालं. तो मूळचा उत्तर प्रदेशचा असल्याने पोलिसांनी थेट त्याचे गाव गाठत त्याला ताब्यात घेतलं आहे. या आरोपीवर पुण्यातील इतर पोलीस ठाण्यात सुद्धा गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jeera water vs saunf water: जीरा की बडीशेप...; सकाळी-सकाळी कोणतं पाणी पिणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर

Maharashtra News Live Update: शालार्थ आयडी घोटाळाप्रकरणी जळगावात नाशिकच्या विशेष पथकांची धडक

PM Kisan Yojana : पीएम किसानचा 24वा हप्ता कधी येणार? ऑक्टोबरमध्ये खात्यात जमा होणार ₹2,000? जाणून घ्या मोठी अपडेट

Sugar Price: मोठी बातमी! साखरेचे भाव १०० पार जाणार? सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना बसणार झटका

New Rules India : आजपासून १० नवे बदल, LPG सिलेंडरपासून बँकिंगपर्यंत नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT