Pune Crime News Wife pours boiling water on husband body shocking incident in Warje area Saam TV
मुंबई/पुणे

Pune Crime News: नवरा साखर झोपेत, बायको दबक्या पावलांनी आली अन्... पुण्यातील खळबळजनक घटना

Pune Husband Wife Clash News: साखर झोपेत असलेल्या पतीच्या अंगावर पत्नीने उकळते पाणी टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेत पती गंभीरित्या भाजला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

साम टिव्ही ब्युरो

Pune Crime News: विद्येचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरातून (Pune News) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. साखर झोपेत असलेल्या पतीच्या अंगावर पत्नीने उकळते पाणी टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेत पती गंभीरित्या भाजला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

थरकाप उडवणारी (Crime News) ही घटना शिवणे परिसरात गुरुवारी (ता. १३) पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. महादेव जाधव (वय ३०, रा. शिवणे) असे जखमी झालेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी संशयित महिलेविरोधात वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, महादेव जाधव यांनी पत्नीच्या भावाला काही रक्कम उधार दिली होती. पैशांची अडचण असल्याने त्यांनी मेहुण्याला पैसे परत करण्यास सांगितले. भावाला दिलेले उधार पैसे सतत मागत असल्यावरून पत्नीच्या मनात राग होता.

या रागाच्या भरात पत्नीने गुरूवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास घरात झोपेत असलेल्या पतीच्या अंगावर गरम उकळलेले पाणी टाकले. या घटनेत महादेव गंभीरित्या भाजले आहेत. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याप्रकरणी वारजे पोलिस ठाण्यात पत्नीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गुजरातला जास्त, महाराष्ट्राला कमी... महाराष्ट्राचे खासदार दिल्लीत भांडले पाहिजेत, अर्थ संकल्पावर बच्चू कडूंचा घणाघात

Monday Horoscope : अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका, अन्यथा...; ५ राशींच्या लोकांना प्रगतीचा मार्ग गवसणार

Ladki Bahin Scheme: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना लवकरच मिळणार २१०० रुपये, उपमुख्यमंत्र्यांची घोषणा

अर्थसंकल्प केवळ श्रीमंतांसाठी, निव्वळ पोकळ दावे; प्रकाश आंबेडकरांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Maharashtra Live News Update: कराडजवळील उंब्रज येथील गणेश धाब्याजवळ माल वाहतूक ट्रक पेटला

SCROLL FOR NEXT