Mumbai Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Crime News: पुण्यानंतर मुंबईत तलवार गँग सक्रिय; भररत्यात दहशत माजवतानाचा व्हिडिओ व्हायरल

Talwar Gang: नालासोपारा येथे भर रस्त्यात एक तरुण हातात तलावारी फिरवून लोकांमध्ये दहशत माजवत आहे.

चेतन इंगळे साम टीव्ही वसई विरार

Mumbai Talwar Gang: पुण्यातील कोयता गँगनंतर आता मुंबईतील नालासोपारा येथे एका तरुणाचा दहशत माजवण्याचा व्हिडिओ समोर आला आहे. नालासोपारा येथे भर रस्त्यात एक तरुण हातात तलावार फिरवून लोकांमध्ये दहशत माजवत आहे. याबाबतचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, नालासोपारा पूर्वेच्या संतोषभुवन परीसरात तरुणाने तलवार फिरवली आहे. बुधवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडलीये. तरुणाला हातात तलवार घेतल्याचे पाहून परिसरातील इतर नागरिक भयभीत झाले होते. नागरिक या तरुणाला असे करण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र हा तरुण कोणाचेही ऐकत नव्हता.

भररस्त्यात तो तलवार फिरवत राहिला. तसेच येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांवर तलवार उगारत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. व्हिडिओ वायरल झाल्यानंतर पेल्हार पोलिसांनी या तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू केला आहे.

चड्डी बनियान टोळीचे सदस्य सीसीटीव्हीत कैद

चंद्रपूर शहरातील एका ख्यातनाम शाळेतील सीसीटीव्ही यंत्रणेत एक ताजा धक्कादायक व्हिडिओ चित्रित झालाय. दोन तारखेच्या पहाटेच्या सुमारास चड्डी बनियान टोळीचे सदस्य शाळेच्या इमारतीत फिरताना आढळून आलेत. चड्डी बनियान टोळीच्या सदस्यांच्या तोंडावर मास्क आणि अंगावर मोजकेच कपडे आहेत.

या टोळीने नागपूर मार्गावरील शाळेच्या इमारतीसह आसपासच्या काही व्यावसायिक प्रतिष्ठानामध्ये देखील घुसखोरीचा प्रयत्न केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. पोलिसांच्या विविध पथकांनी या संपूर्ण सीसीटीव्ही व्हिडिओची शहानिशा केली असून आंध्रप्रदेशातील चड्डी- बनियान टोळीशी या सदस्यांचे काही साधर्म्य आहे की हा अन्य कुठला चोरीचा प्रकार असू शकतो, याबाबत पडताळणी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Alu Vadi Recipe: रोज मुलांना डब्यात काय द्यायचं? टेन्शन सोडा, बनवा कुरकुरीत आळू वडी; वाचा रेसिपी

Heart attack: हार्ट अटॅकचा धोका वाढवतात या 9 गोष्टी; लक्षणं ओळखून वेळीच उपचार करा

KKK 15 Winner : 'खतरों के खिलाडी १५' च्या ट्रॉफीवर कोणी कोरलं नाव? प्राईज मनीसोबत मिळाली एकापेक्षा एक आकर्षक बक्षिसे

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

SCROLL FOR NEXT