Pune TakTak Gang News Saam TV
मुंबई/पुणे

Pune TakTak Gang: पुणेकरांनो सावधान! शहरात फिरतेय टकटक गँग; अशी करताहेत चोरी

Pune TakTak Gang News: पुण्यात कोयता गँगनंतर आता टकटक गँगने धुमाकूळ घालण्यास सुरूवात केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Pune TakTak Gang: गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कोयता गँगने चांगलाच धुमाकूळ घातला होता. पोलिसांनी शोधमोहिम राबवून कोयता गँगच्या गुंडांच्या मुसक्या आवळण्यास सुरूवात केली. ज्या भागात या गुंडांनी दहशत केली. तेथूनच पोलिसांनी त्यांची मिरवणूक काढली. दरम्यान, पुण्यात कोयता गँगनंतर आता टकटक गँगने धुमाकूळ घालण्यास सुरूवात केली आहे. (Latest Marathi News)

पुण्याचा मध्यभाग म्हणून ओळख असणाऱ्या डेक्कन परिसरात टकटक गँग पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे. डेक्कन परिसरातील वर्दळ असलेल्या जंगली महाराज रस्ता फर्ग्युसन रस्ता आणि शिवाजीनगर भागात सध्या या टकटक गँगने चांगलीच धुमाकूळ घातला असून नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. (Breaking Marathi News)

या टकटक गँगचे वैशिष्ट्य असे की, यातील गुंड हे चार चाकी वाहनाच्या काचेवर टकटक करून ते कारमधील व्यक्तीचे लक्ष विचलित करून जबरी चोरी करतात. अशाच एका घटनेत चोरट्यांनी ४० हजारांचा ऐवज चोरून पोबारा केला आहे.

याप्रकरणी डेक्कन पोलीस (Police)ठाण्यात ४४ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. त्यावरून एका अनोळखी चोरट्याविरोधात गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यक्ती हे कर्वेनगर भागात राहतात. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ते जंगली महाराज रस्त्यावर आले होते.

पेट्रोल पंपासमोर विरूद्ध दिशेला गाडी लावून ते थांबलेले असताना अज्ञात युवक त्याठिकाणी आला. त्याने काचावर टकटक वाजवत तुमचे खाली काही तरी पडले आहे, अशी बतावणी केली. तक्रारदार खाली उतरताच त्यांच्या शिटवरील ४० हजारांचा लॅपटॉप व कागदपत्रे चोरून पोबारा केला. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: धान उत्पादक आक्रमक! भंडाराच्या साकोलीत शेतकऱ्यांचा धडक ट्रॅक्टर मोर्चा..

अभिजीत दीपके अन् आशुतोष रांका यांना अटक होणार; ट्विटने खळबळ

Chanakya Niti: लग्नाआधी जोडीदार निवडताना या 7 गोष्टी नक्की तपासा; नाहीतर नंतर पश्चात्ताप होऊ शकतो

Kitchen Safety Tips: गॅस- स्टोव्हच्या जवळ 6 वस्तू ठेवणे टाळा, वास्तुशास्तानुसार ठरू शकते घातक

Ginger Tea : रोज आल्याचा चहा पिता? थांबा! ५ गंभीर दुष्परिणाम वाचताच 'ही' सवय सोडाल

SCROLL FOR NEXT