Dattatray Gade Saam Tv
मुंबई/पुणे

Dattatray Gade : ड्रोन कॅमेरे, १०० पोलीस, श्वानपथक; दत्ता गाडेचं काय झालं? VIDEO

Pune Crime News : पुण्यातल्या स्वारगेट डेपोमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाला. या प्रकरणी आरोपी दत्तात्रय गाडेचा पोलीस शोध घेत आहेत. आरोपीच्या शोध घेण्यासाठी १०० पोलिसांचे पथक गावात दाखल झाले आहे.

रोहिदास गाडगे

Pune Crime : पुण्यातल्या स्वारगेट बस डेपोमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना काल उघडकीस आली. आरोपीने तरुणी एकटी असल्याचा फायदा घेत तिच्यावर बलात्कार केला. ही तरुणी पुण्याहून फलटणला तिच्या घरी जात होती. हा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी आरोपी दत्तात्रय गाडेचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे.

दत्तात्रय गाडेचा शोध घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस दलातील १०० पोलिसांचे पथक गुणाट गावात दाखल झाले आहे. हे १०० पोलिसांचे पथक थेट ऊसाच्या शेतात घुसून तपास करणार आहे. पुणे ग्रामीण पोलिसांचे पथक पोहोचल्यापूर्वी ड्रोन आणि श्वान पथकाकडून तपास सुरु आहे.

पुणे पोलील दत्तात्रय गाडेचा शोध घेत आहेत. शिरूरमध्ये पोलिसांकडून ड्रोन इमेजिंग केले आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, दत्ता हा शिरूरच्या ऊसाच्या शेतामध्ये लपला होता. पुणे पोलीस दलाच्या पथकांकडून दत्तात्रय गाडेचा शोध सुरु आहे. त्याला शोधण्यासाठी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने १३ पथकं तयार केली आहेत.

आरोपी दत्तात्रय गाडे हा शिरूर तालुक्यातील गुणाट गावातला असल्याची माहिती समोर आली आहे. तो राजकीय नेत्याचा कार्यकर्ता असल्याचेही समोर आले आहे. महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीत दत्ता गाडे हा प्रचारात सहभागी देखील झाला होता. पोलिसांच्या चौकशीनुसार, तो राजकीय व्यक्ती, पोलीस यांच्या संपर्कात असल्याचे म्हटले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पत्रकारांना शिवीगाळ, धमकी देणारे खासदार संजय दिना पाटील नरमले; दिलगिरी व्यक्त केली, नेमकं काय घडलं? सर्व सांगितलं

Face care: मॉइश्चरायझ आणि स्मूथ त्वचेसाठी रात्री झोपण्यापूर्वी लावा ही पेस्ट, २ आठवड्यात दिसेल फरक

मुंबई सायबर पोलिसांची मोठी कारवाई; 3206 फसवणुकीच्या गुन्ह्यांत सहभाग असलेल्या टोळीचा पर्दाफाश

Maharashtra News Live Update: संजय दिना पाटील यांच्या विधानाच्या निषेधार्थ धुळ्यात जोडो मारो आंदोलन

Paasport Fees : पासपोर्ट काढणं महागलं! केंद्र सरकारनं वाढवली फी, आता किती रुपये मोजावे लागणार?

SCROLL FOR NEXT