Pune Crime Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News: पुणे हादरले! अल्पवयीन मुलीवर चुलत भावांकडून बलात्कार, पीडिता गरोदर राहिल्याने संतापजनक घटना उघड

Pune Police: पुण्यामध्ये अल्पवयीन मुलीवर दोन चुलत भावांनी बलात्कार केला. पीडित मुलीने बाळाला जन्म दिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आली.

Priya More
  • पुण्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार

  • दोन चुलत भावानी केलं भयंकर कृत्य

  • पीडिता गरोदर राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड

सचिन जाधव, पुणे

पुण्यामध्ये अल्पवयीन मुलीवर चुलत भावांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. पुण्याच्या भोर तालुक्यातील एका गावात हा प्रकार घडला. दोन अल्पवयीन चुलत भावांनी १४ वर्षीय अल्पवयीन चुलत बहिणीवर बलात्कार केला. पीडित मुलगी गरोदर राहिली. तिच्या प्रसूतीनंतर हा संतापजनक घटना उघडकीस आला. पीडित मुलीच्या फिर्यादनंतर दोन्ही भावांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

भोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घराशेजारी राहणाऱ्या दोन चुलत भावांनी पीडित मुलीसोबत हे भयंकर कृत्य केले. पीडित अल्पवयीन मुलीवर आरोपींनी जानेवारी २०२६ मध्ये बळजबरीने दोन-तीन वेळा माळरानावर नेऊन बलात्कार केला. पीडित मुलगी घाबरल्याने हा प्रकार आजतगायत कोणालाही सांगितला नव्हता. आरोपी पीडितेला वारंवार त्रास देत होते.

मात्र अल्पवयीन पीडित मुलगी गरोदर राहिल्याने हा प्रकार समोर आला. पीडित मुलगी ससून रुग्णालय येथे उपचारासाठी गेली असता पीडीतेची प्रसूती झाली. ससून रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी भोर पोलिस ठाण्याशी संपर्क करून संबंधित घटनेची माहिती दिली. दरम्यान भोर पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी ससून रुग्णालयात धाव घेत पीडित मुलीचे जाबजबाब नोंदविले. पीडितेची फिर्याद दाखल करून घेत पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. बहीण भावांच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेवर संताप व्यक्त केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा, रणदीप मलिक मास्टरमाइंड असल्याचा तपास यंत्रणांना संशय

प्रवाशांचे टेन्शन झालं दूर! टोल नाक्यांवर मिळणार स्वच्छ टॉयलेट अन् पार्किंग सुविधा, NHAI कडून मार्गदर्शक सूचना जारी

Pimpri-Chinchwad : रविवारची सुट्टी बनवा खास! पिंपरी-चिंचवडजवळील 'ही' ७ सुंदर ऐतिहासिक ठिकाणे फिरा

Green Tea Vs Black Tea: ग्रीन टी की ब्लॅक टी, हृदयासाठी कोणता चहा सर्वात फायदेशीर? जाणून घ्या.

Marathi Actor : मराठमोळ्या अभिनेत्यावर कोसळला दुःखाचा डोंगर; वडिलांचे निधन, सिनेसृष्टीवर शोककळा

SCROLL FOR NEXT