Pune Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime: ५० टोळ्या,२९७ आरोपी... पुण्यात ‘मोक्का' कारवाईचे धडाकेबाज अर्धशतक; पोलीस आयुक्तांचा गुन्हेगारांना दणका

Pune Police News: जानेवारीपासून आज अखेर शहरातील ५० गुंड टोळ्यांतील २९७ गुन्हेगारांवर ‘मोक्का’ कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे.

Gangappa Pujari

सचिन जाधव, प्रतिनिधी...

Pune Crime News: पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी दिवसेंदिवस चिंतेचा विषय ठरत आहे. याविरोधात आता पुणे पोलीस आयुक्तांनीही कारवाईचा धडाका सुरू केला आहे. आत्तापर्यंत पुणे पोलीस आयुक्तांनी तब्बल ५० टोळ्यांवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई केली आहे. (Crime News In Marathi)

याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यात (Pune Crime) गुन्हेगारांविरुद्ध ‘मोका’चे अर्धशतक करत पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी गुन्हेगारांना चांगलाच दणका दिला आहे. नागरिकांमध्ये दहशत पसरविणाऱ्या टोळ्यांवर जरब बसविण्यासाठी पोलिसांनी गुन्हेगारांची ‘कुंडली’ काढून त्यांच्यावर ‘मोका’चा कायदेशीर इलाज सुरू केला आहे.

जानेवारीपासून आज अखेर शहरातील ५० गुंड टोळ्यांतील २९७ गुन्हेगारांवर ‘मोक्का’ कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. एखाद्या भागात गुंड टोळक्याने धुडगूस घातल्यास त्या गुन्हेगारांचे मागील रेकॉर्ड तपासून ‘मोका’ची कारवाई करण्यात येत आहे. शहरातील विविध भागात दहशत माजवणाऱ्या गुंडांना या कारवाईने चांगलीच जरब बसणार आहे.

धानोरीतील गुंड अभिषेक रमेश तांबे (वय २१, रा धानोरी), सुमीत नागेश लंगडे (वय २५, रा. इंदिरानगर, लोहगाव रस्ता) आणि प्रज्ज्वल प्रशांत शिंदे (वय १८, रा. धानोरी रस्ता) या तिघांवर ‘मोका’ कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आलेली ही ५० वी कारवाई ठरली. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर गुंड टोळ्यांवर केलेली ही ५० वी ‘मोका’ची कारवाई आहे.

या गुन्ह्यातील आरोपींनी एका तरुणावर कोयत्याने वार करुन जखमी केले होते.त्यांच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणीचे गुन्हे दाखल आहेत. आत्तापर्यंत १ जानेवारी ते २० ऑगस्टपर्यंत पुणे पोलीस आयुक्तांनी ५० टोळ्यांमधील २९७ आरोपींवर मोकाची कारवाई केली आहे. यामध्ये २४६ जण अटकेत आहेत तर ५१ आरोपी फरार आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरण; सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

Ambarnath Crime : अंबरनाथमधील हल्ला प्रकरणात धक्कादायक खुलासा; सहा तरुणांविरोधात गुन्हा दाखल

Politics : 'ED-CBIची चौकशी थांबवा; आम्ही भाजपमध्ये येतो...' बड्या खासदाराचा खळबळजनक दावा

Crime: 'एका रात्रीत तीन वेळा...', घरी बोलावून घेतलं, खासदाराकडून २ तरुणांवर बलात्कार

SCROLL FOR NEXT