Pune PMP Bus Driver Murder  Saam TV
मुंबई/पुणे

Pune Crime News: पुण्यात मध्यरात्री पीएमपी बसचालकाची हत्या; जांभूळवाडी परिसरातील खळबळजनक घटना

Pune PMP Bus Driver News: राजेंद्र दिवेकर असं हत्या झालेल्या पीएमपी बसचालकाचे नाव असून याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

Satish Daud

Pune PMP Bus Driver Murder

गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. किरकोळ कारणावरून मारहाण तसेच खूनासारख्या गंभीर घटना घडत आहेत. एकीकडे पोलीस गुन्हेगारांच्या मुसक्या आवळत असताना दुसरीकडे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जांभूळवाडी परिसरात पीएमपी बसचालकाची हत्या करण्यात आली आहे.

शुक्रवारी (१५ सप्टेंबर) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. राजेंद्र दिवेकर असं हत्या झालेल्या पीएमपी बसचालकाचे नाव असून याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. अशोक कुंभार,रोहीत पाटेकर असं अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत राजेंद्र दिवेकर आणि आरोपी अशोक कुंभार,रोहीत पाटेकर शुक्रवारी रात्री एकत्र दारू पीत बसले होते. दारू पिताना त्यांच्यामध्ये काही कारणावरून वाद झाला. क्षणात या वादाचे रुपांतर हाणामारी झाले. आरोपी अशोक कुंभार, रोहीत पाटेकर यांनी राजेंद्र यांना तुंबळ मारहाण केली.

या मारहाणीत राजेंद्र दिवेकर यांचा मृत्यू झाला. दरम्यान, परिसरातील नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच भारतीय विद्यापीठ पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दिवेकर यांचा मृतदेह ताब्यात घेऊन आरोपींना अटक केली आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हरभजन सिंह यांच्यासह ७ खासदार भाजपात जाणार, वाचा लिस्ट

Maharashtra News Live Update: TCS प्रकरणात सरकारी वकील म्हणून अजय मिसर यांनी काम पाहावं, पोलीस आयुक्तांचे सरकारला पत्र

Saturday Horoscope: शनिदेव होणार या ५ राशींवर होणार प्रसन्न, खर्च वाढेल; वाचा शनिवारचे खास राशीभविष्य

Shivali Parab Photos: 'किती दिवस घालणार एकच...' नव्या फोटोशूटमुळे शिवाली परब झाली ट्रोल

Cholesterol medicine: कोलेस्ट्रॉलची औषधं मध्येच थांबवली तर काय होतं? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT