Crime News saam tv
मुंबई/पुणे

Pune Crime News: मामीकडून भाचीवर लैंगिक अत्याचार; संतापजनक घटनेनं पुणे हादरलं

Pune Crime: मामा कामासाठी बाहेर गेल्यावर मामी ९ वर्षांच्या चिमुकलीला विवस्त्र करायची आणि मारहाण करायची. तसेच तिच्यावर लैंगिक अत्याचा देखील करत होती.

साम टिव्ही ब्युरो

Pune News:

पुणे जिल्ह्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका मामीनेच आपल्या भाचीवर लैंगिक अत्याचार केला आहे. पोलिसांत या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून मामीला अटक करण्याता आली आहे. सदर घटनेमुळे संपूर्ण पुणे जिल्हा हादरून गेलाय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, तब्बल २ वर्षांनंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे. जानेवारी ते ऑगस्ट २०२१ मध्ये भाची आपल्या मामाकडे राहण्यासाठी आली होती. त्यावेळी मामा कामासाठी बाहेर गेल्यावर मामी ९ वर्षांच्या चिमुकलीला विवस्त्र करायची आणि मारहाण करायची. तसेच तिच्यावर लैंगिक अत्याचा देखील करत होती.

कोरोना काळात चिमुकलीच्या आईने तिला आपल्या भावाच्या घरी ठेवले होते. भाऊ हवाई दलात नोकरी करत असून तो आपल्या कुटुंबासह हवाई दल वसाहतीत राहतो. कोरोना काळानंतर मुलगी पुन्हा आपल्या घरी गेली तेव्हा तिने घडलेली घटना आपल्या आईला सांगितली. त्यानंतर पीडित मुलीच्या आईने मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस ठाण्यात धाव घेतली.

पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, मामी चिमुकलीला सतत मारहाण करायची. तिला विवस्त्र करून तिचे फोटो काढायची तसेच जीवे मारण्याची धमकीही देत होती. पोलिसांनी पोस्को कायद्याअंतर्गत मामी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. तसेच नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाडेपट्ट्याने शेतजमीन करणाऱ्या शेतकऱ्यांना पीककर्ज मिळेल का? जाणून घ्या नियम

Maharashtra News Live Update: नीलम गोर्हे कल्याण जीआरपी पोलीस ठाण्यात दाखल

Gold Investment: आता NSE वर शेअर्सप्रमाणे खरेदी करू शकाल सोने; काय आहे EGR? जाणून घ्या फायदे-तोटे

एकनाथ शिंदेंना मोठा धक्का बसणार, शिवसेनेतील बडा नेता नाराज? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Accident: पालघरमध्ये वऱ्हाडाच्या ट्रकला कंटेनरची धडक, १२ जणांचा मृत्यू; मुंबई- अहमदाबाद महामार्गावर रक्ताचा सडा

SCROLL FOR NEXT