Vanraj Andekar Case Saam Tv
मुंबई/पुणे

Vanraj Aandekar Death: 'मारा मारा... दोघांनाही सोडू नका', वनराज आंदेकरांच्या बहिणीनेच दिली चिथावणी; त्या दिवशी नेमकं काय घडलं?

Vanraj Andekar Killed Case Update: वनराज आंदोकर यांच्या हत्येप्रकरणी पुणे पोलिसांनी आंदेकरांच्या दोन्ही बहिणी, मेहुणा, भाच्यासह १५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर ५ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

Priya More

पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची गोळ्या झाडून आणि कोयत्याने हल्ला करत निर्घृण हत्या करण्यात आली. कौटुंबिक वादातूनच त्यांची हत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे. वनराज यांची हत्या करणारे आणि सुपारी देणारे दुसरे तिसरे कोणी नसून त्यांच्या दोन सख्ख्या बहिणी आणि मेहुणेच आहेच. याप्रकरणी आतापर्यंत ५ जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये आंदेकर यांचे दोन्ही बहिणी आणि मेहुण्यांचा समावेश आहे.

वनराज आंदोकर यांच्या हत्येप्रकरणी पुणे पोलिसांनी आंदेकरांच्या दोन्ही बहिणी, मेहुणा, भाच्यासह १५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. इतर आरोपी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. ज्या दिवशी आंदोकरांवर हल्ला झाला त्यावेळी त्यांच्या बहिणीनेच 'मारा मारा... दोघांनाही सोडू नका' अशी चिथावणी हल्लेखोरांना दिली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

वनराज आंदेकर यांची बहीण संजीवनी कोमकर आणि तिचा नवरा जयंत कोमकर यांचा रविवारी आकाश सुरेश परदेशी याच्याशी वाद झाला होता. संजीवनी आणि जयंत कोमकर हे तक्रार देण्यासाठी समर्थ पोलिस ठाण्यात गेले होते. त्याठिकाणी वनराज आंदेकर आपला चुलत भाऊ शिवम आंदोकरसोबत आले होते. त्यावेळी संजीवनी आणि जयंत हे तक्रारदार आकाशला शिवीगाळ करत मारहाण करत होते. पण त्यावेळी वनराज यांनी मध्यस्ती करत त्यांचे भांडण सोडवले.

संजीवनी आणि जयंत यांना वनराजनेच आपल्या दुकानावर अतिक्रमण कारवाई करण्यास सांगितल्याचा संशय होता. त्यावेळी 'वनराज तू आमच्या दुकानावर कारवाई करण्यास सांगितलं. आमच्या पोटावर तू पाय दिला. तुला आज पोरं बोलावून ठोकणार.' अशी डायरेक्ट धमकी कोमकरने वनराज यांना दिली. वनराज यांचे वडील यांनी पोलिसांना ही माहिती दिली.

संजीवनी आणि जयंत यांनी वनराज यांच्या हत्येचा कट रचला होता. त्यांनी आपल्या साथीदारांना नानापेठेमध्ये बोलावून घेतलं. रविवारी रात्री वनराज आणि त्यांचा चुलत भाऊ शिवम गप्पा मारत होते. त्याचवेळी दुचाकीवरून आलेल्या तरुणांनी त्यांच्यावर गोळीबार करण्यास आणि कोयत्याने हल्ला करण्यास सुरूवात केली. त्यावेळी वनराज यांची बहीण संजीवनी ही घराच्या टेरेसवरून बघत होती. भावावर जीवघेणा हल्ला होत असल्याचे पाहून तिने हल्लेखोरांना 'मारा मारा... दोघांनाही सोडू नका' अशी चिथावणी दिली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शरद पवार पुणे जिल्ह्यात करणार दुष्काळ दौरा

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT