Pune Budhwar Peth Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News: बुधवार पेठेत गेला अन् हौस केली, नंतर पेमेंट अ‍ॅपचा पासवर्डच विसरला; ३ वेश्यांनी चांगलाच तुडवला

Pune Budhwar Peth: पुण्यातील बुधवार पेठेमध्ये गेलेल्या एका तरुणाला ३ वेश्यांनी बेदम मारहाण केली. या तरुणाला पेमेंट करत असताना पासवर्ड आठवला नाही. या प्रकरणी तिन्ही महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Priya More

सागर आव्हाड, पुणे

पुण्यातील बुधवार पेठेमध्ये एका तरुणाला वेश्यांनी बेदम मारहाण केली. ही घटना सध्या चर्चेत आली आहे. बुधवार पेठेमधील वेश्या वस्तीत वेश्यागमनाकरिता गेलेल्या तरुणाला हा नाद चांगलाच नडला. तीन वेश्यांनी या तरुणाला चांगलाच तुडवला. बुधवार पेठेमध्ये जाऊन या तरुणाने हौस पूर्ण केली त्यानंतर त्याने पैसे देताना पेमेंट अ‍ॅपचा पासवर्ड विसरल्याचे सांगितले. त्यानंतर संतप्त झालेल्या ३ महिलांनी या तरुणाला चांगलाच धडा शिकवला. सध्या या घटनेची पुण्यात चांगलीच चर्चा रंगली आहे. याप्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात ३ वेश्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तमन्ना (वय ३२, रा. दत्तवाडी), तनुजा (वय ३४, रा. नविनबिल्डींग, बुधवार पेठ), सोनिया (वय ३२, रा. नविन बिल्डींग, बुधवार पेठ) अशी गुन्हा दाखल झालेल्या वेश्या महिलांची नावे आहेत. याप्रकरणी ३९ वर्षीय तरुणाने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी ३ महिलांविरोधात गुन्हा दाखल केला. ही घटना शुक्रवारी १२ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी तरुण वेश्यागमनाकरिता बुधवार पेठेतील नवीन बिल्डिंगमध्ये गेला होता. त्याने तमन्नाला सोबत घेतले. या महिलेने वेश्यागमनाची रक्कम ऑनलाईन पद्धतीने पाठविण्यास सांगितली. फिर्यादी तरुणाला त्याच्या ऑनलाईन पेमेंट अ‍ॅपचा पासवर्ड आठवत नव्हता. त्याने पासवर्ड आठवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला पासवर्ड आठवत नव्हता.

पासवर्ड आठवत नसल्यामुळे चिडलेल्या आरोपी महिलेने 'पैसा नही तो ईधर काय को आया' असे म्हणत फिर्यादीला शिवीगाळ करायला सुरुवात केली. त्यानंतर अन्य दोन आरोपी असलेल्या तनुजा आणि सोनिया यांनी शिवीगाळ करत या तरुणाला मारहाण केली. तरुणाने याप्रकरणी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिस उपनिरीक्षक पुनम पाटील या प्रकरणाचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल

वाहनाचे इंजिन ऑइल खराब झाले हे कसं ओळखायचं? ही १ गोष्ट लक्षात ठेवा

Fort History : २६ वर्षे मराठा साम्राज्याची राजधानी, मुघलही थकले, पण जिंकू शकले नाहीत हा अभेद्य किल्ला

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

SCROLL FOR NEXT