Kondhwa Murder News Saam Tv News
मुंबई/पुणे

Pune Crime : फोन करुन मैदानात बोलावलं, आर्थिक कारणावरुन जोरदार भांडण; पुण्यात दगड टाकून हत्या

Pune Crime News : आर्थिक वादातून ५२ वर्षीय नागरिकाच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याची ही घटना कोंढव्यातील पारशी मैदान परिसरात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अभय कदम आणि बादल शेरकर या दोघांना अटक केलीय.

Prashant Patil

सचिन जाधव, साम टीव्ही

पुणे : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्याचदरम्यान, पुणे शहरात आणि ग्रामीण भागात याचे लोण जास्त प्रमाणात पसरलं आहे. हत्या, बलात्कार, दरोडा अशा अनेक प्रकारच्या घटना दररोज ऐकायला मिळत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. आर्थिक वादातून डोक्यात दगड घालून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

आर्थिक वादातून ५२ वर्षीय नागरिकाच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याची ही घटना कोंढव्यातील पारशी मैदान परिसरात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अभय कदम आणि बादल शेरकर या दोघांना अटक केलीय. तर सुभाष परदेशी (वय ५२) असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. याबाबत त्यांची पत्नी हेमलता परदेशी (वय ४५) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कदम आणि परदेशी यांच्यात आर्थिक कारणावरुन वाद झाले होते. परदेशी यांनी उर्वरित पैसे न दिल्यानं त्यांच्यात वाद झाला होता. आरोपी कदम आणि शेरकर यांनी परदेशी यांना कोंढव्यातील एका हॉटेलजवळील मैदानात बोलावून घेतलं. तेथे जोरात खंडाजंगी झाली. त्यानंतर आरोपींनी परदेशी यांच्या डोक्यात दगड घालून हत्या केली. हत्या करुन पसार झालेल्या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास कोंढवा पोलीस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: समृद्धी महामार्गावरील दरोडाच्या सूत्रधार बीडमधून जेरबंद

5 Sweet Foods For Diabetes: डायबिटीजच्या रूग्णांसाठी ५ गोड पदार्थ फायदेशीर; रक्तातील साखर राहील नियंत्रणात

H1N1 flu symptoms: साधा ताप समजून दुर्लक्ष करताय? H1N1 ची ही गंभीर लक्षणं दिसल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या

Tingling In Feet : तुमच्या पायांना सतत मुंग्या येतात; 'या' गंभीर आजाराचे आहे लक्षण, असा कराल बचाव?

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत मोठा घोटाळा? 14,298 पुरुषांना मिळाले ₹1,500; धक्कादायक माहिती उघड

SCROLL FOR NEXT