Shubhada Kodare Killed Video Saam Tv
मुंबई/पुणे

Shubhada Kodare Case: पुण्याच्या आयटी कंपनीतल्या शुभदा कोदारेच्या हत्येचा थरकाप उडवणारा VIDEO बघा

Shubhada Kodare Killed Video: पुण्यातल्या येरवडा येथील एका आयटी कंपनीमध्ये काम करणाऱ्या शुभदा कोदारेची मंगळवारी हत्या करण्यात आली होती. या हत्येचा थरारक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Priya More

अक्षय बडवे, पुणे

पुण्यातील आयटी कंपनीमध्ये काम करणाऱ्या शुभदा कोदारे या तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली होती. शुभदाच्याच कंपनीमध्ये काम करणाऱ्या सहकाऱ्याने पार्किंमध्ये चॉपरने वार करत तिची हत्या केली होती. पोलिसांनी आरोपी कृष्णा कनोजाला अटक केली आहे. पैशाच्या वादातून आरोपीने तिची हत्या केली. अशामध्ये शुभदाच्या हत्येचा थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर आला आहे.

पुण्यातल्या येरवडा येथील एका आयटी कंपनीमध्ये काम करणाऱ्या शुभदा कोदारेची मंगळवारी हत्या करण्यात आली होती. या घटनेचा थरारक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, शुभदावर आरोपी कृष्णा पार्किगमध्ये चॉपरने वार करताना दिसत आहे. पार्किंगमध्ये शुभदाच्या हत्येचा थरार सुरू होता तेव्हा सर्वजण गर्दी करून बघत होते. आरोपीच्या हातामध्ये चॉपर असल्यामुळे घाबरून कोणी मदतीसाठी धावला नाही.

या हल्ल्यात गंभीर जखमी झालेली शुभदा जमिनीवर कोसळते आणि तिचा जागीच मृत्यू होता. शुभदाचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच आरोपी कृष्णा त्याच्या हातामधील चॉपर खाली टाकून देतो. त्यानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्याला पकडून चोप दिला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने आपल्या मोबाईलमध्ये या हत्याकांडाचा व्हिडीओ शूट केला होता. जो सध्या व्हायरल होत आहे.

आरोपी कृष्णाची चौकशी केली असता त्याने पोलिसांना धक्कादायक माहिती सांगितली. शुभदाने कृष्णाचा विश्वासघात केला होता. त्यामुळे त्याने तिला अद्दल घडवायचे ठरवले होते पण तिला जीवे मारण्याचे नसल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. वडिलांच्या आजारपणाचे कारण सांगून शुभदाने कृष्णाकडून वेळोवेळी पैसे घेतले.

शुभदाने त्याच्याकडून तब्बल ४ लाख रुपये घेतले होते आणि ती आणखी पैसे मागत होती. मात्र कृष्णाला जेव्हा शुभदाच्या वडिलांना कोणताच आजार नसल्याचे कळाले तेव्हा त्याने तिच्याकडून पैसे मागितले. यावरून दोघांनध्ये वाद झाले. शेवटी त्याने तिला अद्दल घडवायचे ठरवून तिच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात तिचा मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohini Khadse: कोण आहे रोहिणी खडसे? जाणून घ्या त्यांच्याविषयी

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

7 minutes after death: मृत्यूनंतर 7 मिनिटांत काय घडतं? पाहा वैज्ञानिक दृष्टीकोनातून समोर आलेल्या धक्कादायक गोष्टी

GK: महिलांनी साष्टांग नमस्कार का टाळावा? काय आहे यामागचं शास्त्रीय कारण

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

SCROLL FOR NEXT