israel hamas war Saam TV
मुंबई/पुणे

Pune News : इस्राइल-हमास युद्धाचे पुण्यात पडसाद; वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न, पाहा VIDEO

साम टिव्ही ब्युरो

अक्षय बडवे

Pune News :

इस्राइल-हमास युद्धाचा आजा १७वा दिवस आहे. हमासने केलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात इस्राइलने युद्ध पुकारले आहे. गेल्या १७ दिवसांपासून इस्राइलकडून गाझा पट्टीत रॉकेट हल्ले सुरु आहेत.

बॉर्डरवर इस्राइलने आपलं सैन्य देखील उभं केलं आहे. या युद्धाचे पडसाड पुण्यात पाहायला मिळाले. एकंदर पुण्याचं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांकडून करण्यात आलं. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पुण्यातील रस्त्यांवर इस्राइल देशाच्या राष्ट्रध्वजाची प्रतिकृती असलेले स्टिकर्स लावण्यात आले आहेत. जाणून बुजून रस्त्यांवर हे राष्ट्रध्वजाचे स्टिकर चिटकवल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पुणे शहरातील 4 पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Latest Marathi News)

पुण्यातील लष्कर, समर्थ, कोंढवा आणि खडक पोलीस स्टेशनमध्ये वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर या सगळ्या गुन्ह्यांमध्ये शहरभरातून एकूण 6 आरोपींची ओळख पटली आहे.

चारही पोलीस स्टेशनच्या हद्दीत रस्त्यावरती इस्राइलच्या राष्ट्रध्वजाचे फोटो असलेले स्टिकर्स चिटकवण्यात आले होते. पोलिसांकडून संबंधित ठिकाणी जात सर्व स्टिकर्स काढण्यात आले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला मिळणार 3000 रुपये? CM शिंदे यांनी केलं मोठं वक्तव्य; वाचा...

IND-W vs PAK-W: You Miss I Hit..! पहिलीच ओव्हर अन् रेणुकाच्या In Swinger वर फेरोजाची दांडी गुल

Marathi News Live Updates : पुण्यात भरधाव वेगात असलेल्या डंपरने घेतला तरुणीचा जीव

Trend Shoes In India: शूजच्या या टॉप ब्रँडनी भारतीयांना घातलेय भूरळ, सध्या खूपच आहेत ट्रेंडिंगमध्ये

Ajit Pawar : भाऊबीजेची ओवाळणी मिळेल, पण लाडक्या भावाला विसरू नका; अजित पवार असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT