Pune Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime : सोशल मीडियावर ओळख, तरुणीला भेटायला बोलावलं अन् 4 जणांनी केला अत्याचार

Pune News: पुण्यात सोशल मीडियावर झालेल्या ओळखीतून तरुणीवर चार जणांनी अत्याचार केल्याची घटना घडली आहे.

Saam Tv

अक्षय बडवे, साम टीव्ही, प्रतिनिधी

पुण्यात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका मुलीवर चार जणांनी अत्याचार केल्याची घटना घडली आहे. सोशल मीडियावरून झालेल्या ओळखीतून महाविद्यालयीन मुलीवर ही अत्याचाराची घटना घडली आहे.

याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी पॉक्सोसह बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी ४ जणांना पोलिसांनी अटक केली असून यातील दोन आरोपी अल्पवयीन आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. महाविद्यालयात सुरू असलेल्या गुड टच बॅड टच या उपक्रमातून ही घटना समोर आलीय. ही घटना समोर आल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसला आहे.

पीडित तरुणीसोबत हा सगळा प्रकार एप्रिलपासून घडत आला होता. पीडित तरुणी तिच्या वडिलांच्या फोनवरून सोशल मीडिया वापरत होती, अशी माहिती समोर आली आहे. यावरूनच आरोपी तरुणांशी तिची मैत्री झाली. दरम्यान, आरोपी तरुण हे एकमेकांना ओळखत नाहीत. पिडीत तरुणीला भेटण्यासाठी आलेल्या एकाने तिच्यावर महाविद्यालयात अत्याचार केले.

तर दुसऱ्याने तिच्या घरी तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. इतर २ तरुणांनी सुद्धा तिला वेगवेगळ्या ठिकाणी बोलावून तिच्यावर अतिप्रसंग केला. या सर्व घटना पिडीत तरुणीने तिच्या मैत्रिणीला सांगितल्या, तसेच महाविद्यालयात सुरू असलेल्या 'गुड टच बॅड टच' अभियानात असलेल्या समुपदेशक यांना सांगितल्या. यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला.

हे संपूर्ण प्रकरण पीडित मुलीच्या आई आणि वडिलांना समजल्यानंतर त्यांच्या पायाखालून जमिनी सरकली. त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत या प्रकरणी गुन्हा दाखल केला. यानंतर पोलिसांनीही तात्काळ कारवाई करत आरोपींचा शोध घेत त्यांना बेड्या ठोकल्या. याप्रकरणी पोलीस पुढील कारवाई आणि तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bank Close: बँकेची कामं पडणारं पेंडिंगवर; सोमवारी बँका असतील बंद, काय आहे कारण

Maharashtra News Live Update: Mumbai: गृहमंत्री अमित शाह यांची पत्रकार परिषद

Vastu Tips for Bathroom Taps: बाथरूममध्ये नळ बसवताना लक्षात ठेवाव्यात ‘या’ ५ महत्त्वाच्या टिप्स

Skincare Routine: फेसवॉश ते सनस्क्रीन; स्किनकेअर रुटीनमध्ये कोणते प्रोडक्ट कधी आणि कसे वापरायचे?

माजी पंतप्रधानांच्या नातवाचा कारनामा! तुरुंगातील फोनमध्ये सापडले 145 अश्लील व्हिडिओ; देशभरात खळबळ

SCROLL FOR NEXT