Gaurav Ahuja Saam Tv
मुंबई/पुणे

Gaurav Ahuja : गौरव आहुजा पुणे पोलिसांना कधी शरण येणार? माफी मागत आरोपीने वेळच सांगितली!

Gaurav Ahuja Video : पुण्यातल्या शास्त्रीनगर सिग्नलवर लघुशंका आणि विकृत चाळे करणाऱ्या गौरव आहुजाचा शोध पोलीस घेत आहेत. गौरवने एक व्हिडीओ शेअर करत घडलेल्या प्रकाराची माफी मागितली आहे.

Yash Shirke

Pune News : पुण्याच्या येरवडा परिसरात गौरव आहुजा या तरुणाने मद्यधुंद अवस्थेमध्ये अश्लील वर्तन केले. त्याने सिग्नल सुरु असताना कार रस्त्यात थांबून लघुशंका केली. लोकांना जाब विचारल्यावर विकृत चाळे करत पळ काढला. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली. पोलिसांनी गौरवचा मित्र भाग्येशला ताब्यात घेतले. आता गौरव आहुजालाही अटक झाल्याची माहिती समोर आली आहे.

गौरव आहुजा हा पुण्यातील हॉटेल व्यावसायिक मनोज आहुजा यांचा मुलगा आहे. आज गौरव मद्यधुंद अवस्थेत येरवडा परिसरात कार चालवत होता. शास्त्रीनगरच्या सिग्नलवर रस्त्याच्या मधोमध कार थांबवून त्याने लघुशंका केली. नागरिकांनी हटकल्यावर विकृत चाळे करत पळ काढला. या प्रकरणानंतर पोलिसांनी गौरवचा शोध घ्यायला सुरुवात केली.

गौरव आहुजा अजूनही फरार आहे. पण त्याने व्हिडीओ शेअर करत सर्वांची जाहीर माफी मागितली आहे. 'माझ्याकडून रस्त्यात मध्ये जे कृत्य झालं होतं, ते खूप चुकीचं होतं. संपूर्ण जनता, पोलीस आणि शिंदे साहेबांची मी माफी मागतो. मला एक संधी द्या, मी माफी मागतो. सॉरी. माझ्या कुटुंबीयांना त्रास देऊ नका. मी पुढच्या आठ तासात येरवडा पोलीस ठाण्यात सरेंडर होईन' असे व्हिडीओमध्ये गौरवने म्हटले आहे.

गौरव आहुजाची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरुपाची आहे. गौरववर जुगार आणि अपहरणाचा गुन्हा दाखल आहे. त्याचे वडील मनोज आहुजा देखील गुन्हेगारी विश्वात सक्रीय आहेत. हे बापलेक खंडणी, पोकर गेम, क्रिकेट सामन्यांची बेटींग, मटक्याचा व्यवसाय अशा विविध स्वरुपाच्या व्यवसायांमध्ये सहभागी असल्याची माहिती उघडकीस आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Friday Horoscope: या राशींच्या आज मनातील इच्छा होतील पूर्ण; वाचा राशीभविष्य

होर्मुजमधल्या केबल्सवरुन इराणचा इशारा, तेलाच्या आगीत इंटरनेटची ठिणगी?

Maharashtra News Live Update: सागर नाईक यांनी भर सभेत महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांना सुनावले खडेबोल

ट्रम्प यांनी ओकली भारताविरोधात गरळ, ट्रम्प यांच्याकडून भारताचा नरक असा उल्लेख

MI vs CSK : हार्दिक-सूर्या फ्लॉप, पण संजू सॅमसनचं वादळ; चेन्नईने मुंबईला बालेकिल्ल्यात १०३ धावांनी चारली धूळ

SCROLL FOR NEXT