Pune Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Pune Crime News: सावधान! महापालिकेत बड्या पगाराच्या नोकरीचे आश्वासन; उच्चशिक्षित तरुणाला घातला लाखोंचा गंडा

Fraud Case: या घटनेत आरोपी विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ruchika Jadhav

सचिन जाधव

Pune News: राज्यात सध्या बेरोजगारी ही एक मोठी समस्या बनली आहे. उच्चशिक्षित असूनही लाखो तरुणाई अद्याप नोकरीच्या शोधात आहे. अशात सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन देत एका व्यक्तीला लाखोंचा गंडा घालण्यात आला आहे. या घटनेत आरोपी विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, महापालिकेत सध्या जागा आहेत. मी तुम्हाला तेथे नोकरी (Job) मिळवून देऊ शकतो. त्यासाठी फक्त काही पैशांची गरज लागेल असे सांगून फसवणूक करण्यात आली आहे. सरकारी नोकरी आणि तेही महापालिकेत म्हटल्यावर फिर्यादी व्यक्तीने नोकरीसाठी आरोपीवर विश्वास ठेवला.

त्यानंतर या तरुणाकडून आरोपीने लाखो रुपयांची मागणी केली. जून २०१९ ते नोव्हेंबर २०२१ या कालावधीत तरुणाने सर्व पैसे भरले. भास्कर (वय ३८, रा. सदाशिव पेठ) असे गुन्हा दाखल केलेल्या संशयिताचे नाव आहे. आरोपीने फिर्यादीना पुणे महापालिकेत नोकरीसाठी ५ लाख रुपये लागतील, असं आधी सांगितलं होतं.

त्यापैकी चार लाख रुपये अगोदर आणि उर्वरित एक लाख रुपये काम झाल्यावर द्यावे लागतील, असे सांगितले. त्यावर फिर्यादीने मोहोळ याच्या बँक खात्यात २ लाख २० हजार रुपये जमा केले. परंतु नोकरी न लागल्याने फसवणूक (Fraud) झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. मिळालेल्या तक्रारीनुसार आरोपीवर गुन्हा दाखल करून विश्रामबाग पोलिस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : आयुष्यात मोठं काही तरी घडणार; ५ राशींच्या लोकांच्या नशिबात चमत्कार होणार, दिवस चांगला जाणार

LPG cylinder : झोलझपाटा बंद! ओटीपी नाही तर LPG गॅस सिलिंडर नाही, नवा नियम काय?

Viral Video: चाट खाताय तर सावध व्हा; चप्पल घालून बटाटे स्वच्छ करतानाचा व्हिडिओ व्हायरल

Pune : कारवाई कमी अन् कर्मचाऱ्याची "हवा"च जास्त, पुणे महापालिकेच्या रिलस्टारची जोरदार चर्चा

Pune : पुण्यात भयंकर अपघात, चिमुकल्या बहीण-भावाला ट्रेम्पोनं चिरडलं, हसत्या-खेळत्या घरावर दु:खाचा डोंगर

SCROLL FOR NEXT