Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News: शिक्रापूरमध्ये हत्येचा थरार, माजी उपसरपंचाचा दिवसाढवळ्या खून

Shikrapur Police Station:

रोहिदास गाडगे

पुणे जिल्ह्यातल्या शिक्रापूरमध्ये माजी उपसरपंचाची निर्घृण हत्या करण्यात आली. अज्ञाताने माजी उपसरपंचावर रविवारी दुपारी धारधार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यामध्ये ते गंभीर जखमी झाले. अति रक्तस्त्राव झाल्यामुळे उपसरपंचाचा मृत्यू झाला. याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत शोध सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिक्रापूर येथे माजी उपसरपंच दत्तात्रय गिलबिले यांच्यावर आज दुपारी प्राणघातक हल्ला करण्यात आला. अज्ञात तरुणाने धारदार शास्त्राने दत्तात्रय यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या मानेवर आणि पाठीवर गंभीर स्वरूपाचे वार करण्यात आले. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ पुण्यातील रुग्णालयात हलवण्यात आले पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

माजी उपसरपंच दत्तात्रय गिलबिले यांची त्यांच्या घराजवळच अज्ञात तरुणाने हत्या केली. दत्तात्रय गिलबिले यांच्या हत्येमागचे कारण अस्पष्ट आहे. या घटनेमुळे शिक्रापूर परिसरात खळबळ उडाली असून तणावाचे वातावरण आहे. या घटनेची गंभीर दखल घेत शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दीपरत्न गायकवाड यांनी या परिसरात बंदोबस्त लावला आहे. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे तर आरोपीच्या शोधासाठी पथके पाठवण्यात आली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live: नाशिक शहरात सकाळपासून पावसाने घेतली विश्रांती

Lung Cancer Stage 1: फुफ्फुसांच्या कॅन्सरच्या स्टेज 1 मध्ये ही 5 लक्षणं दिसून येतात; शरीर देत असलेले संकेत वेळीच ओळखा

School Closed : शाळा - महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, नाशिक जिल्हा प्रशासनाचा निर्णय

Mumbai Tourism : वीकेंडला जोडीदारासोबत निवांत वेळ घालवा, 'ही' आहेत मुंबईतील रोमँटिक अन् सुंदर ठिकाणे

Hingoli Accident: महामार्गावर भयंकर अपघात! खड्ड्यात कार आदळून उलटली, २ तरुणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT