Firing On Businessman In Pune Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime: पुण्यामध्ये काय चालललेय? दिवसाढवळ्या व्यावसायिकावर गोळीबार, गंगाधाम परिसर हादरला!

Firing On Businessman In Pune: पुण्यामध्ये वाळू व्यावसायिकावर गोळीबार करण्यात आला असून यामध्ये तो गंभीर जखमी झाला आहे. पुणे पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

Priya More

अक्षय बडवे, पुणे

पुण्यामध्ये गणेश विसजर्नाच्या पूर्वसंध्येला गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. पुण्यामध्ये दिवसाढवळा व्यावसायिकावर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारामध्ये एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. पुणे पोलिसांकडून गोळीबार करणाऱ्यांचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यामध्ये वाळू व्यावसायिकावर गोळीबार करण्यात आला. पुण्यातील गंगाधाम परिसरात गोळीबाराची ही घटना घडली. गोळीबारात वाळू व्यावसायिक गंभीर जखमी झाला आहे. २ ते ३ अज्ञात तरुणांनी वाळू व्याव्यसायिकावर गोळीबार केला. या हल्ल्यात २ राऊंड फायर झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पूर्व वैमनस्यातून हा प्रकार घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी झालेल्या वाळू व्यावसायिकाला तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. हल्ला करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथकं रवाना झाली आहेत. भरचौकात आणि दिवसाढवळ्या हा गोळीबार झाल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bank Close: बँकेची कामं पडणारं पेंडिंगवर; सोमवारी बँका असतील बंद, काय आहे कारण

Maharashtra News Live Update: Mumbai: गृहमंत्री अमित शाह यांची पत्रकार परिषद

Vastu Tips for Bathroom Taps: बाथरूममध्ये नळ बसवताना लक्षात ठेवाव्यात ‘या’ ५ महत्त्वाच्या टिप्स

Skincare Routine: फेसवॉश ते सनस्क्रीन; स्किनकेअर रुटीनमध्ये कोणते प्रोडक्ट कधी आणि कसे वापरायचे?

माजी पंतप्रधानांच्या नातवाचा कारनामा! तुरुंगातील फोनमध्ये सापडले 145 अश्लील व्हिडिओ; देशभरात खळबळ

SCROLL FOR NEXT