Pune Crime Saamtv
मुंबई/पुणे

Pune Crime News: वारजे माळवाडी परिसरात भरदिवसा तरुणावर गोळीबार; पुण्यात खळबळ

Pune Latest News: मोटारसायकलवरून आलेल्या तिघांनी गोळीबार सुरू केला, भरदिवसा घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Dnyaneshwar Choutmal

Warje Malwadi Crime: पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी सध्या चिंतेचा विषय ठरत आहे. कधी कोयता गँगचा धुमाकूळ तर कधी कोयत्याने मारामाऱ्या झाल्याच्या अनेक बातम्या समोर येत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. आज( १७, जून) पुण्यात अशीच एक धक्कादायक प्रकार आला आहे. पुण्यात भरदिवसा तिघांनी गोळीबार केल्याची घटना घडली आहे. (Crime News In Marathi)

याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यातील (Pune) वारजे माळवाडी परिसरात भरदिवसा गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत मोटारसायकलवर आलेल्या तिघांनी ३ राऊंड फायर केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. गोळीबारात सुरज तात्याबा लंगार हा २१ वर्षीय तरूण जखमी झाला. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वारजे माळवाडी (Warje Malwadi) परिसरातील जय भवानी चौक पाण्याच्या टाकीजवळुन सुरज जात असताना मोटारसायकलवरून आलेल्या तिघांनी गोळीबार सुरू केला. ही गोळी जखमी तरुणाच्या डाव्या बाजूला चाटून गेली असून त्याला उपचारासाठी रूग्णालयात रवाना करण्यात आले आहे. (Latest Marathi News)

घटनास्थळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. भरदिवसा घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, हा हल्ला कोणत्या कारणामुळे झाला? जखमी तरुण आणि मारेकरी यांच्यामध्ये कसला वाद होता? अशा अनेक प्रश्नांची उकल करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे, त्या दृष्टीने त्यांचा तपास सुरू आहे. (Crime News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs DC: अभिषेक शर्माच्या शतकाच्या मदतीनं हैदराबादने दिल्लीला दिली मात,SRHच्या विजयानंतर Points Table मध्ये मोठी उलथापालथ

Shocking : दुसऱ्या जातीची सून नको! संतापलेल्या चुलत्याचा पुतण्यावर जीवघेणा हल्ला

तरुणीला लॉजवर बोलवलं, अश्लील मेसेज पाठवले; जावेदला मुलीनं दाखवला हिसका, कल्याणमध्ये नेमकं झालं काय?

बारामती पोटनिवडणुकीत पवार कुटुंब एकत्र, सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेला सुळेंची हजेरी

भाऊ-भाऊ म्हणतात आणि पाय खेचतात, नितीन गडकरींचा निशाणा कोणावर?|Video Viral

SCROLL FOR NEXT