Pune Crime News doctor physical relation 32-year-old woman by giving an injection Saam TV
मुंबई/पुणे

Pune Crime News: आधी दिलं कमरेत इंजेक्शन; नंतर महिलेसोबत केलं संतापजनक कृत्य, पुण्यातील डॉक्टरला अटक

Pune Crime: पीडितेला त्याने कमरेत इंजेक्शन देण्याच्या बहाण्याने कपडे उतरायला लावले. कुणी नसल्याची संधी साधत त्याने पीडितेवर बलात्कार केला.

साम टिव्ही ब्युरो

Pune Crime News: विद्येचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरातून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. इथे एका डॉक्टरनेच त्याच्याकडे उपचारासाठी आलेल्या महिलेवर वारंवार बलात्कार केला आहे. पुण्यातील मांगडेवाडी कात्रज परिसरातील एका क्लिनिकमध्ये हा संतापजनक प्रकार घडला. याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी डॉक्टराला अटक केली आहे. (Latest Marathi News)

डॉ. अमित आनंदराव दबडे असं या नराधम डॉक्टराचं नाव आहे. मागील दीड वर्षांपासून म्हणजेच १ जुलै २०२२ पासून हा प्रकार घडत असल्याचा आरोप महिलेने केला आहे. हा प्रकार वाढत गेल्याने पोलिसांकडे तिने धाव घेतली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी डॉक्टर अमित दबडे याचे कात्रज परिसरात मांगडेवाडी या ठिकाणी क्लिनिक आहे.  (Breaking Marathi News)

सदर क्लिनिकमध्ये तपासणी करण्याकरीता ३२ वर्षीय पीडित महिला आल्यानंतर त्याची तिच्याशी ओळख झाली होती. त्यानंतर डॉक्टरने महिलेचा मोबाईल क्रमांक घेऊन तिला मोबाईल फोनवर मेसेज आणि कॉल करून तिच्याशी गोड गोड बोलून त्याच्या हॉस्पिटलमध्ये बोलवून घेतले. त्यानंतर तिचा हात धरून तिच्या छातीला हात लावून तिच्यासोबत गैरकृत्य केलं.

नराधम डॉक्टर इतक्यावरच थांबला नाही, तर त्याने या प्रकाराबाबत माफी मागण्याच्या बहाण्याने तिला क्लिनिकमध्ये बोलावलं. त्यानंतर पीडितेला त्याने कमरेत इंजेक्शन देण्याच्या बहाण्याने कपडे उतरायला लावले. कुणी नसल्याची संधी साधत त्याने पीडितेवर बलात्कार (Crime News) केला.

काही दिवस महिलेची इच्छा नसताना तिचा वारंवार पाठलाग करून तिला डॉक्टरने त्रास दिला. अखेर याबाबत महिलेने पोलिसांकडे धाव घेत, डॉक्टर विरोधात तक्रार दाखल केली. या प्रकारानंतर पोलिसांनी (Police) डॉक्टरांवर थेट कारवाई केली आहे. दवाखान्यातून डॉक्टराला अटक केली आहे. डॉक्टरने केलेल्या कृत्यामुळे सगळीकडून संताप व्यक्त केला जात आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे प्रवासात २५ मिनिटे वाचणार, मिसिंग लिंकचं काम पूर्ण, या दिवशी होणार सुरू

कामाची बातमी! मुंबईहून पुणे अन् कोल्हापूरसाठी विशेष रेल्वे, वाचा वेळापत्रक अन् थांबे

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये महापौर पद भाजपकडेच राहण्याची शक्यता

Pune Accident : दीड वर्षापूर्वी लग्न, आता अपघातात मृत्यू, पुण्यात एसटी बसने उड्डाणपूलावर राजाला उडवले

IND vs NZ: श्रेयस की इशान, तिलक वर्माच्या जागी कोण खेळणार? सूर्याने २ वाक्यात विषय संपवला अन् कारणही सांगितलं

SCROLL FOR NEXT