Pune Latest News Saamtv
मुंबई/पुणे

Pune Crime: हॉटेल मॅनेजर आणि वेटरकडून ग्राहकाला बेदम मारहाण; पुण्यातील खळबळजनक घटना

Pune Latest News: मारहाणीत तरुण जखमी झाला असून हॉटेल मॅनेजरसह ६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Gangappa Pujari

अक्षय बडवे, प्रतिनिधी...

Pune Crime News: पुणे शहरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जेवणाच्या बिलावर लावलेल्या सर्विस टॅक्सबद्दल विचारणा केल्याने हॉटेल चालकाकडून ग्राहकाला मारहाण करण्यात आली. या मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला असून हॉटेल मॅनेजरसह ६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, हुजेफा अतरवाला हा तरुण आपल्या मैत्रिणीसह एन आय बी एम रस्त्यावर असलेल्या स्पाइस फॅक्टरी या हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. हॉटेल मध्ये जेवण झाल्यानंतर त्यांच्या जेवणाच्या बिलावर आलेल्या सर्विस टॅक्स बाबत त्यांनी हॉटेल मॅनेजरला विचारणा केली.

या गोष्टीचा राग मनात ठेऊन हॉटेल मॅनेजर ने ५ ते ६ वेटरला हाताशी घेऊन अतरवाला यांना काचेच्या बॉटलने तसेच काचेच्या बरणीने मारहाण केली. या मारहाणीत हुजेफा अतरवाला याप्रकरणी हॉटेल मॅनेजरसह इतर वेटरवर गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, पुणे शहरातील वाघोली परिसरात एका हत्येची घटनाही समोर आली आहे. पुण्यातील वाघोली परिसरात पैशाच्या कारणावरुन मित्रांनीच मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून दोघांना अटक करण्यात आली आहे. शैलेंद्र मंडगीकर असे मृत तरुणाचे नाव आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budget 2026 Live Updates: अर्थसंकल्प सादर होण्याआधीच शेअर मार्केट धडाम! सेनसेक्स, निफ्टीमध्ये घसरण

Gold Silver Rate Today: अर्थसंकल्पाआधीच गुडन्यूज! सोनं ₹१३००० तर चांदी २७००० रुपयांनी घसरली

Maharashtra Politics: भाजपचा हा सर्वात मोठा डाव, सुनेत्रा पवारांच्या शपथविधीनंतर बच्चू कडूंचं खळबळजनक विधान

Pakistan Blast : पाकिस्तान हादरले! १४ शहरात ४८ ब्लास्ट, १२० जणांचा मृत्यू, शेकडो गंभीर जखमी

Sangli Crime : पोटच्या मुलासमोरच वडिलांची दगडाने ठेचून हत्या; सांगलीत भररस्त्यात हत्याकांड

SCROLL FOR NEXT