Pune airport  Saam tv
मुंबई/पुणे

Pune News: पुणे विमानतळावरून अंतर्वस्त्रातून ७३ लाखांचे सोने घेऊन जात होता, हालचालींवरुन कस्टम अधिकाऱ्यांना शंका अन् बिंग फुटलं

pune crime news in Marathi: पुणे विमानतळावर अंतर्वस्त्रातून सोन्याची तस्करी करणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. अंतर्वस्त्रातून सोने लपवून तस्करी करणाऱ्या दुबईहून आलेल्या प्रवाशाला ताब्यात घेण्यात आलं आहे.

Vishal Gangurde

Pune Crime News:

पुणे विमानतळावर अंतर्वस्त्रातून सोन्याची तस्करी करणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. अंतर्वस्त्रातून सोने लपवून तस्करी करणाऱ्या दुबईहून आलेल्या प्रवाशाला ताब्यात घेण्यात आलं आहे. त्याच्याकडून ७३ लाखांचे सोने जप्त करण्यात आलं आहे. पुणे विमानतळावर केंद्रीय सीमाशुल्क विभागाने शंका आली. त्यानंतर प्रवाशाची कसून तपासणी केल्यानंतर त्याच्याकडे सोने सापडले. कस्टम विभागाने ही मोठी कारवाई केली आहे. (Latest Marathi News)

सोन्याच्या तस्करी प्रकरणी प्रवाशाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कस्टम विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे विमानतळावर शनिवारी दुबईहून आलेल्या एका प्रवाशाच्या हालचाली संशयास्पद दिसल्याने अधिकाऱ्यांना शंका आली. त्यानंतर कस्टमच्या पथकाने या प्रवाशाची तपासणी केली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)


या प्रवाशाच्या अंतर्वस्त्रात प्लास्टिकच्या पिशवीत सोन्याची भुकटी लपवल्याचे आढळून आले. या प्रवाशाकडून एक हजार ३५६ ग्रॅम सोने जप्त केले. या सोन्याची किंमत ७३ लाख २८ हजार रुपये इतकी आहे.

दरम्यान, कस्टम विभागाच्या पथकाने ११ जानेवारीला देखील दुबईहून आलेल्या प्रवाशाकडून एकूण ९ लाख ६४ हजार रुपयांचं सोने जप्त केलं होतं. त्याच्याकडे एकूण १५० ग्रॅम सोने आढळलं. या प्रवाशाने पट्ट्याला २४ कॅरेट सोन्याचे बक्कल लावले होते.

तर १४ जानेवारीला दुबईहून आलेल्या प्रवाशाकडे १५३ ग्रॅम वजनाच्या सोन्याचा बांगड्या, परदेशी सिगारेटची पाकिटे, चार किलो तंबाखू आणि अत्तरांच्या बाटल्या आढळल्या होत्या. प्रवाशाकडे आढळलेला मुद्देमालाची किंमत ११ लाख २८ हजार रुपये इतकी होती. पथकाने हा मुद्देमाल जप्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावती शिक्षक मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार निश्चित

मोठा राजकीय भूकंप! जिगरी मित्रपक्षच देणार भाजपला धक्का; सत्ताधारी पक्षासोबत आघाडीत सहभागी होणार

Walmik Karad: माझ्या मुलाला अडकवण्यासाठी तुरूंगातून कट, बीडच्या खासदारानं थेट वाल्मिक कराडचं संभाषण ऐकवलं

Pakistan Airstrike : पाकिस्तानचा अफगाणिस्तान एअरस्ट्राइक; मध्यरात्रीच्या हवाई हल्ल्यात ५ मुलांसह ९ जणांचा दुर्दैवी अंत

Dahi Kadhi Recipe : ना फुटेल, ना चव बिघडेल! एकदा 'अशी' बनवून पाहा दही-कढी

SCROLL FOR NEXT