Youth Thrashed Over Money Dispute in Rajgurunagar Saam Tv
मुंबई/पुणे

पुण्यात चाललंय काय? भाजप नेत्याकडून तरुणाला बेदम मारहाण, कारमधून बाहेर खेचलं; नंतर...

Youth Thrashed Over Money Dispute in Rajgurunagar: भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यांच्यासह पाच जणांनी २० वर्षीय तरुणाला मारहाण केल्याची तक्रार खेड पोलिसांकडे दाखल झाली आहे. रात्रीच्या वेळी पैसे वाटण्यावरुन झालेल्या गैरसमजातून मारहाण झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे

Bhagyashree Kamble

रोहिदास गाडगे, साम टिव्ही

पुण्यात गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र आहे. अशातच राजगुरूनगरमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मध्यरात्री एका मारहाणीची घटना घडली आहे. भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यांच्यासह पाच जणांनी मिळून २० वर्षीय बेदम मारहाण केली. पैसे वाटण्यावरुन झालेल्या गैरसमजातून मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

ही धक्कादायक घटना राजगुरूनगर येथील तिन्हेवाडी रोडवरील एका सोसायटीजवळ घडली आहे. साई पिंगळे (वय वर्ष २०) असे मारहाण झालेल्या तरूणाचे नाव आहे. हा तरूण कारमध्ये बसला होता. कारमधून बाहेर काढून त्याला मारहाण करण्यात आली. भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यांच्यासह पाच जणांनी मिळून त्याला मारहाण केली.

रात्रीच्या वेळेस ही घटना घडली असून, पैसे वाटण्यावरून झालेल्या गैरसमजातून ही मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दरम्यान, या घटनेनंतर तरूणानं खेड पोलिसांकडे धाव घेतली. तसेच आरोपींविरोधात तक्रार दाखल केली.

या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. निवडणूक काळात उमेदवारांकडूनच अशा प्रकारे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याने, मतदार खरंच सुरक्षित आहेत का? असा गंभीर प्रश्न या घटनेनंतर उपस्थित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Period Care : पीरियड्समध्ये अति गोड खाणे पडू शकते महागात, फूड क्रेव्हिंग 'असं' करा कंट्रोल

Vertical Property Card: सरकारचा मोठा निर्णय; प्रत्येक फ्लॅट मालकाला मिळणार ‘ खास कार्ड’, काय आहेत फायदे?

Waking up at 3am: रात्री नेमकी ३ वाजताच जाग येते? कारणं जाणून घ्या आत्ताच

Maharashtra News Live Update: बारामती-राहुरी पोटनिवडणूक सार्वजनिक सुट्टी, सामान्य प्रशासन विभागाचा निर्णय

Bollywood Couple Pregnant: पुन्हा गोड बातमी! बॉलिवूड स्टार कपलच्या घरी 'बेबी नं. 2'ची चाहूल

SCROLL FOR NEXT