Nitin Mhaske Case  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime News: नितीन म्हस्के हत्या प्रकरणी पुणे पोलिसांची मोठी कारवाई, ४८ तासांत सर्व आरोपींना अटक

Nitin Mhaske Case Update: याप्रकरणी पुणे पोलिसांनी अवघ्या ४८ तासांमध्ये फरार झालेल्या सर्व आरोपींना अटक केली आहे.

Priya More

अक्षय बडवे, पुणे

Nitin Mhaske Case: पुण्यातील नितीन म्हस्के हत्या प्रकरणी (Nitin Mhaske Case) पुणे पोलिसांनी (Pune Police) मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी अवघ्या ४८ तासांमध्ये फरार झालेल्या सर्व आरोपींना अटक केली आहे. महाराष्ट्रासह वेगवेगळ्या राज्यात जाऊन सापळा रचत पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. बुधवारी रात्री पुण्यातील मंगला टॉकीज समोर नितीन म्हस्केची धारधार शस्त्रांनी वार करत हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, नितीन म्हस्के हत्या प्रकरणी पुणे पोलिसांनी 48 तासांमध्ये 12 आरोपींना अटक केली. पूर्ववैमन्यास्यातून आणि वर्चस्व वादातून नितीनची हत्या करण्यात आली होती. नितीनच्या हत्येनंतर सर्व आरोपी फरार झाले होते. या घटनेनंतर नितीनच्या कुटुंबीयांनी जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यानंतर पोलिसांनी या घटनेचा गांभीर्य लक्षात घेत सर्व आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत त्यांचा शोध सुरु केला.

या प्रकरणातील सर्वा आरोपी नितीनच्या हत्येनंतर फरार झाले होते. फक्त महाराष्ट्रातच नाही तर वेगवेगळ्या राज्यात आरोपी पळून गेले होते. या सर्वां अटक करणं पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं. पण पुणे पोलिसांनी या सर्व आरोपींनी अवघ्या ४८ तासांमध्ये अटक केली. या सर्व आरोपींना लातूर, सोलापूर, कोल्हापूर आणि कर्नाटकातील बेळगाव, रायचूर या ठिकाणी जाऊन सापळा रचून पुणे पोलिसांनी अटक केली.

दरम्यान, पुण्यामध्ये बुधवारी मंगला टॉकीजच्या समोर 'मुळशी पॅटर्न' चित्रपटाप्रमाणे नितीन म्हस्के या तरुणाची हत्या करण्यात आली होती. १० ते १२ जणांच्या टोळक्याने तलवार, पालघन, काठ्या, लोखंडी गजने सपासप वार करुन नितीनती हत्या केली होती. या घटनेत नितीनचा जागीच मृत्यू झाला होता. नितीन म्हस्के याचे काही दिवसांपूर्वी कोरेगाव पार्कमध्ये आरोपींसोबत कुठल्यातरी कारणावरून भांडण झाले होते. यावेळी नितीन म्हस्केने आरोपींपैकी एकावर हल्ला केला होता. याचाच राग मनात धरुन नितीनची हत्या करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT