Pune Police  Saamtv
मुंबई/पुणे

Pune Crime News: व्यावसायिकावर कोयत्याने वार करुन माजवली दहशत; पुणे पोलीस आयुक्तांकडून ३ जणांवर मोक्काची कारवाई

Pune Latest News: २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी दर्गा वसाहत येथे व्यावयायिकावर हल्ला करण्यात आला होता.

Gangappa Pujari

सचिन जाधव, प्रतिनिधी

Pune Crime News: काही दिवसांपूर्वी पुण्यातील खडकी बाजारातील एका व्यावसायिकावर कोयत्याने वार करण्यात आले होते. या प्रकरणी दहशत पसरवणाऱ्या शाहरुख बागवान आणि त्याच्या दोन साथीदारांवर मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. (Crime News In Marathi)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी दर्गा वसाहत येथे व्यावयायिकावर हल्ला करण्यात आला होता. फिर्यादी व्यावसायिक दुकानासमोर झाडू मारताना कचरा अंगावर उडाल्याने शाहरुखने त्यांच्यावर कोयत्याने वार केला.

तसेच शाहरुखच्या साथीदारांनी फिर्यादीला लाकडी दांडक्याने मारहाण केली. या हल्ल्यात व्यावसायिकास गंभीर दुखापत झाली. यानंतर आरोपींनी हत्यारे हवेत फिरवत परिसरात दहशत निर्माण केली.

पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी आतापर्यंत ६१ संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर मोका कायद्यान्वये कारवाई केली आहे. या प्रकरणी टोळीप्रमुख शाहरुख ऊर्फ सुलतान कासीम बागवान (वय २६), मोहसीन कासीम बागवान (वय २३, दोघे रा. दर्गा वसाहत, खडकी) आणि एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल केला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Municipal Election : मोठी बातमी! मतदार यादीत घोळ, मंत्र्यांचेच नाव मतदार यादीत नाही, नवी मुंबईमध्ये गोंधळ

Municipal Elections Voting Live updates : तेजस्वी घोसाळकरांनी बजावला मतदानाचा अधिकार

Namo Shetkari Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी बळीराजाच्या खात्यात ₹२००० जमा होण्याची शक्यता

मोठी बातमी! मुंबईत पहिला दुबार मतदार सापडला, मनसे उमेदवारासमोर भंडाफोड, वाचा नेमकं झालं काय?

Post Office Scheme: पोस्टाची सुपरहीट योजना! एकदा गुंतवणूक करा अन् फक्त व्याजातून महिन्याला ₹५५०० मिळवा

SCROLL FOR NEXT