Pune News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime News : प्रेयसीचा तसाला फोटो स्टेटसला ठेवला; पुण्यातील प्रियकरावर गुन्हा दाखल

पुण्यातील कोंढवा परिसरात हा प्रकार घडला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय जाधव

Pune Crime News : पुण्यातून (Pune) एक संतापजनक बातमी समोर आली आहे. ब्रेकअप झाल्यानंतर प्रियकराने प्रेयसीचे नग्न फोटो व्हॉट्सअ‍ॅप (Whatsapp) स्टेटस ठेवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पुण्यातील कोंढवा परिसरात हा प्रकार घडला आहे. देवेंद्र फुलफगर असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. हा प्रकार १ डिसेंबर रोजी घडला असल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी यांच्यात तीन गेल्या वर्षापासून प्रेम संबंध होते. काही दिवसांपूर्वी दोघाचं ब्रेकअप झालं. त्यानंतर देवेंद्रने त्याच्या प्रेयसीला त्रास द्यायला सुरुवात केली. प्रियकर तिचा मानसिक छळ करत होता. त्यामुळे तिने या त्रासाला कंटाळून पोलिसांत धाव घेतली. तरुणीने आरोपी विरोधात मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा मागे घेण्यासाठी दबाव

हा गुन्हा मागे घ्यावा यासाठी आरोपीने एक डिसेंबर रोजी स्वतःच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस वर फिर्यादी यांचा नग्न अवस्थेतील फोटो ठेवला. त्यानंतर ‘ये तो शुरुआत है’ असे म्हणत फिर्यादीवर दबाव टाकला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: डोंबिवली रेल्वे स्टेशनवर एकादशी वारीचा पारंपरिक गजर

दारु पिऊन शिक्षकाचा शाळेतच विद्यार्थ्यांसोबत डान्स; व्हिडिओ पाहून राग अनावर होईल

Shirdi Sai Temple: विठू माऊली तू, माऊली जगाची...; आषाढीचा उत्साह शिर्डीत, फुलांनी सजले साई मंदिर

Thackeray Brothers : ठाकरेंच्या लढ्याला दक्षिणेचा पाठिंबा, थेट मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक, म्हणाले प्रेरणादायी...

Karjat Tourism : हिरव्यागार जंगलात लपलेला सुंदर धबधबा, पावसाळ्यात वीकेंड येथेच प्लान करा

SCROLL FOR NEXT