pune Crime News Saam tv
मुंबई/पुणे

Pune Crime News: पुण्यात कायदा सुव्यवस्था धाब्यावर; फक्त बघितलं म्हणून 2 तरुणांवर हातोडी आणि स्क्रू ड्रायव्हरने जीवघेणा हल्ला

Pune Crime News: पुण्यातील विजय ढुमे हत्याकांड ताजं असताना आता दोन तरुणांवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे.

Vishal Gangurde

अक्षय बडवे

Pune Crime News

पुण्यातील गुन्हेगारी थांबण्याचे नावच घेईना. पुण्यातील विजय ढुमे हत्याकांड ताजं असताना आता दोन तरुणांवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे. पुण्यातील नाना पेठ येथे आज संध्याकाळी ६ वाजता घटना घडली. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहिती माहितीनुसार, पुण्यात जुन्या वादातून ही घटना घडली आहे. टोळक्याने नजर ठेवून २ तरुणांवर प्राणघातक हल्ला केला आहे. दीड महिने जुन्या वादातून २ तरुणांवर हातोडी आणि स्क्रू ड्रायव्हरने हल्ला केला आहे.

तब्बल ८-१० जणांच्या टोळक्याने या २ तरुणांवर प्राणघातक हल्ला केला आहे. हल्ल्यात एका तरुणाच्या डोक्याला जबर मार लागला आहे. पुण्यातील नाना पेठेत ही घटना घडली आहे.

नेमकं काय घडलं?

बिबेवाडी आणि धनकवडी भागात राहणारे २ तरुण आज पुण्यातील नाना पेठेतील नातेवाईकांकडे आले होते. या दोन्ही तरुणांचे याआधी नाना पेठेतील काही तरुणांशी एकमेकांकडे बघण्यावरुन १.५ महिन्यापूर्वी वाद झाला होता. आज हे दोघेही या भागात येत असल्याची माहिती संबंधित तरुणांना मिळाली.

या माहितीनंतर त्या भागात राहत असलेल्या तरुणांनी त्यांच्यावर नजर ठेवली. ते दोघेही एकत्र नातेवाईकांच्या घरातून बाहेर आले. त्यानंतर या टोळक्याने त्या दोघांवर हातोडी आणि स्क्रू ड्रायव्हरने हल्ला केला.

या हल्ल्यात यातील एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. या गंभीर जखमी तरुणाला ससून रुग्णालयात दाखल केले आहे.

अनिकेत ज्ञानेश्वर दूधभाते (30) आणि निखिल सखाराम आखाडे (27) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. तर संशयित आरोपी यांची नावे रामजी गुजर, आयुष बिडकर, पैलवान आणि यश (पुर्ण नावे अद्याप समोर आलेली नाहीत) असे असल्याचे समजत आहे. याप्रकरणी पोलिसांनी ५ जणांना ताब्यात घेतले आहे. त्याचबरोबर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

SCROLL FOR NEXT