Pune Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Pune Crime News: पुणेकर सावधान! कोयता गँगनंतर रुमाल गँग सक्रिय; रात्रीच्या अंधारात वाहनांची तोडफोड

Crime News: पुणे पोलिसांनी या गँगमधील अनेकांच्या मुसक्या आवळ्यात.

Dnyaneshwar Choutmal

Pune News: पुण्यात काही दिवसांपूर्वी कोयता गँगने मोठा धुमाकुळ घातला होता. रस्त्यावर राडा करत हातात कोयते घेऊन या गँगने सर्वांच्याच जीवाला घोर लावला होता. पुणे पोलिसांनी या गँगमधील अनेकांच्या मुसक्या आवळ्यात. अशात आता पुन्हा एकदा अशीच एक टोळी सक्रिय झाली आहे. (Latest Crime News)

पुण्यात तोंडाला रुमाल बांधून ६ जणांच्या टोळक्याने धुडगुस घातला आहे. परिसरात असेल्या चार चाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. वनशिव झोपडपट्टी परिसरात ३० वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे.

पुण्यातील तुळजाई परिसरात दोन दिवसांपूर्वी अशी घटना घडली होती. काल रात्री पुन्हा एकदा येथील वाहनांवर दगडफेक करत काचा फोडण्यात आल्या आहेत. आज पहाटे हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. सहकारनगर पोलिसांकडून या प्रकरणी आरोपींचा शोध सुरू आहे.

पुण्यात (Pune) सलग दुसऱ्या दिवशी वाहनांची (Vehicles) तोडफोड झाली आहे. काल वारजे परिसरामध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. टोळक्यांनी वाहनांची तोडफोड करण्यामागे काय कारण असावे? ही कोयता गँग असून पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे का? की ही रुमाल गँग आहे? असे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Panvel Tourism : धुक्याने वेढलेले डोंगर अन् निसर्गाचे मनमोहक नजारे, पावसाळ्यात ट्रेकिंगसाठी बेस्ट खारघरमधील 'हे' ठिकाण

Maharashtra News Live Update: पुणे शहर काँग्रेसच्या वतीने आज थेट राजभवनावर आंदोलन

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेता गंभीर जखमी; हाताला दुखापत, अंथरुणावरून उठणेही झाले कठीण

धक्कादायक! व्यापाऱ्याने पत्नी अन् २ मुलींची हत्या केली, त्यानंतर स्वतःही आयुष्य संपवलं

Rain Update : पुण्याला रेड अलर्ट, मुंबईसह १० जिल्ह्याना अतिमुसळधार पावसाचा इशारा; तुमच्या जिल्ह्याचा यात समावेश आहे का?

SCROLL FOR NEXT