PUNE SHOCKER: MARRIED WOMAN DIES BY SUICIDE OVER ALLEGED HARASSMENT, 5 BOOKED Saam Tv
मुंबई/पुणे

Pune : तू रोगीट..." पुण्यात विवाहित महिलेची आत्महत्या, नवऱ्याच्या आणि सासरच्या छळाला कंटाळून उचललं टोकाचं पाऊल

Pune Crime News : पुणे जिल्ह्यात सासरच्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • पुण्यातील दौंड तालुक्यात विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली

  • पती आणि सासरच्या मंडळींकडून मानसिक व शारीरिक छळ होत असल्याचा आरोप

  • पती जबरदस्तीने गर्भनिरोधक गोळ्या देत असल्याचाही गंभीर आरोप

  • पतीसह पाच जणांविरोधात दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला

सागर आव्हाड, पुणे

पुण्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. वैष्णवी हगवणे प्रकरण ताजे असतनाचाच दौंड तालुक्यातील नंदादेवी येथे सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या सततच्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या प्रकरणी पतीसह पाच जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोकुळा पांडुरंग मेरगळ (वय ४१) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोकुळा यांचा विवाह २ जुलै २०२३ रोजी पांडुरंग मेरगळ यांच्यासोबत झाला होता. पांडुरंग यांचे हे दुसरे लग्न होते. लग्नानंतर सुरुवातीला सर्व काही सुरळीत सुरू होते. मात्र, अवघ्या काही महिन्यांतच गोकुळा यांचा छळ सुरू झाल्याचे समोर आले आहे. फिर्यादीत नमूद केल्यानुसार, पती पांडुरंग हा किरकोळ कारणांवरून गोकुळा यांना सतत मारहाण करत असे. “तू रोगीट आणि मनोरुग्ण आहेस. तुझ्या औषधांचा खर्च मला झेपत नाही. माहेरून पैसे आण,” असे म्हणत तो सतत टोमणे मारून मारहाण करत असे.

तसेच गोकुळा गर्भवती राहू नयेत यासाठी त्यांना जबरदस्तीने गर्भनिरोधक गोळ्या दिल्या जात असल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला आहे. या गोळ्या घेण्यास विरोध केल्यास त्यांना मारहाण आणि शिवीगाळ केली जात होती. गोकुळा यांचा संसार टिकावा म्हणून माहेरच्या नातेवाईकांनी अनेकदा मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, छळ थांबला नसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

अखेर सततच्या त्रासाला कंटाळून शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास गोकुळा यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी गोकुळा यांच्या भावाने रवींद्र आप्पासाहेब कित्तुरे यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी पांडुरंग बाळकृष्ण मेरगळ (पती), प्रियवृत पांडुरंग मेरगळ (सावत्र मुलगा), रामचंद्र बाळकृष्ण मेरगळ (दीर), सतीबामाई रामचंद्र मेरगळ (भावजय) आणि आबासो आटोळे (पतीचा मित्र) यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस उपनिरीक्षक कुंभार पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बदलापुरात राजकीय वाद टोकाला; शिंदे गटाच्या नगरसेवकाकडून भाजप पदाधिकाऱ्याच्या मुलाला मारहाण

Homemade BB Cream: 5 मिनिटांत घरच्याघरी बनवा नॅचरल बीबी क्रिम, काचेसारखा चमकेल चेहरा, पैशांचीही होईल बचत

Gold Rate Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण, प्रतितोळा ८०० रूपयांनी स्वस्त, वाचा जळगाव-पुण्यातील ताजे दर

Maharashtra News Live Update: पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर सोन्यात 800 रुपयांची तर चांदी 1000 ची घसरण

Tula Pahta Movie: पहिलं प्रेम म्हणजे न विसरता येणारी आठवण...; 'तुला पाहता' उलगडणार चित्रपटातून तरल प्रेमाची अनवट कहाणी

SCROLL FOR NEXT