Pune Crime News Saam Tv News
मुंबई/पुणे

Pune Crime : रस्त्यावर चालणाऱ्याच्या डोक्यात वार, पुण्यात माथेफिरूने केली तरुणाची निर्घृण हत्या; शहरात खळबळ

Pune Crime News : समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनसमोरील फुटपाथवर एक व्यक्ती जखमी आणि बेशुद्ध अवस्थेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

Prashant Patil

पुणे : अनैसर्गिक संबंधाच्या वादातून एका फिरस्त्याचा डोक्यात वार करून खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शहरातील समर्थ पोलिसांनी खून करून पसार झालेल्या आरोपीला अटक केली आहे. किशोर कांबळे (वय ३७, रा. पुणे स्टेशन , मुळ रा. सातारा) असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. तर या प्रकरणी भीम नामदेव गायकवाड (वय ४०, रा. पुणे स्टेशन, मुळ रा. बाभळगाव, जि. लातुर) याला अटक करण्यात आली आहे. पोलीस हवालदार इम्रान राज मोहम्मद यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनसमोरील फुटपाथवर एक व्यक्ती जखमी आणि बेशुद्ध अवस्थेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांना घटनास्थळाला भेट देवून माहिती घेतली. त्यावेळी कांबळे याच्या डोक्यात वार करून अज्ञाताने त्याचा खून केल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. त्यानुसार समर्थ पोलिसांत खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. तसेच आरोपीचा शोध घेण्यासाठी चार पोलीस पथके रवाना करण्यात आली. घटनास्थळावरील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासून तसेच खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीवरून कांबळे याचा खून भीम गायकवाड याने केल्याचं समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी पुणे रेल्वे स्थानक परिसरातून गायकवाड याला ताब्यात घेतलं. पोलिसांनी त्याला अटक केली असून न्यायालयानं त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, आधी वडिलांनी आपल्या १५ वर्षांच्या मुलाची हत्या केली, नंतर स्वत: गळफास घेत आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. ही धक्कादायक घटना पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात घडली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आणि घटनास्थळी पंचनामा केला. तसेच या घटनेप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT