Kothrud Police Station Saamtv
मुंबई/पुणे

Pune Crime: दुकानाचे शटर तोडून आतमध्ये प्रवेश, तब्बल ५२ लाखांचे २०० मोबाईल लंपास, पुणे शहरात खळबळ

Pune Mobile Shopy Robeery: शहरातील कोथरुड परिसरात हा प्रकार घडला असून मोबाईल शॉपी फोडून चोरट्यांनी तब्बल २०० मोबाइल लंपास केले आहेत.

Gangappa Pujari

अक्षय बडवे, प्रतिनिधी

Pune Kothrud Crime:

एकीकडे गणपती बाप्पाच्या उत्सवाचा जल्लोष सुरू असताना पुणे शहरात मोबाईल चोरीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील कोथरुड परिसरात हा प्रकार घडला असून  मोबाईल शॉपी फोडून चोरट्यांनी तब्बल २०० मोबाइल लंपास केले आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुण्यातील (Pune) कोथरूड भागात २३ सप्टेंबर रोजी मोबाईल शॉपी फोडून चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोथरुड परिसरातील असणाऱ्या डहाणूकर कॉलनीत कलाकृती हौसिंग सोसायटीत गौरव शिंदे यांचे मोबाईलचे दुकान आहे.

शनिवारी मध्यरात्री चोरट्यांनी दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर दुकानातील २०० मोबाईल आणि रोकड चोरी केली. याबाबात माहिती मिळताच कोथरुड पोलीस दाखल झाले.

याबाबत दुकानाचे मालक गौरव सुरेश शिंदे (वय ३१, रा. वारजे) यांनी फिर्याद दिली आहे. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. ऐन गणपती काळात घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अहिल्यानगर हादरले! प्रिन्सिपलने ८ वर्षांच्या विद्यार्थ्याचा घेतला चावा; गळा दाबून २० सेकंद हवेत उचलले

Maharashtra News Live Update: मुसळधार पावसाचा तडाखा; चाळीसगावजवळतच्या गांधी चौकातील नगरपालिकेची जुनी इमारत कोसळली

Cholesterol medicine: सकाळी की रात्री? रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा झाल्यानंतर कोलेस्ट्रॉलची औषधं कधी घेतली पाहिजेत?

Beauty Tips: डार्क अंडरआर्म्सपासून सुटका हवी? तर हे उपाय करतील मदत

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा दिपकेंना फोन, लग्नाबाबत काय विचारलं? | Video

SCROLL FOR NEXT