Young Woman Ends Life Police Recover Letter AI Photo
मुंबई/पुणे

पुण्यातील बुधवार पेठेत भयंकर घडलं; चिठ्ठी लिहून तरूणीनं आयुष्य संपवलं, आत्महत्या करण्यामागचं कारण काय?

Young Woman Ends Life Police Recover Letter: पुण्यातील बुधवार पेठेत १९ वर्षीय तरूणीनं उडी इमारतीच्या टेरेसवरून उडी घेत आयु्ष्य संपवलं. आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट लिहिली.

Bhagyashree Kamble

पुण्यातील बुधवार पेठ परिसरात गुरूवारी सायंकाळी एक तरूणीनं आत्महत्या केली. इमारतीतील टेरेसवरून उडी मारून आयुष्य संपवलं. या धक्कादायक घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली. ही तरूणी नेमकी कोण? तरूणीनं टोकाचं पाऊल का उचललं? तरूणीसोबत नेमकं घडलं काय? असे अनेक प्रश्न काल निर्माण झाले आहे. दरम्यान, पोलीस तपासात काही प्रश्नांचं कोडं सुटलं आहे.

पोलिसांना या प्रकरणाचा तपास करताना सुसाईड सापडली आहे. या सुसाईड नोटमधून सध्या पोलिसांचा तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मानसी (वय वर्ष १९) असे मृत तरूणीचे नाव आहे. तिनं आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहिली होती. या सुसाईड नोटमधून तिनं आत्महत्या करण्यामागचं कारण स्पष्ट केलं आहे.

तरूणीनं सुसाईड नोटमध्ये लिहिलं की, 'मी माझ्या घरातल्या लोकांच्या योग्यतेची नाही. मी स्वत:हून टोकाचं पाऊल उचलत आहे. मला या कामाचा कंटाळा आल्यामुळे स्वत:हून आयुष्य संपवत आहे', असं सुसाईड नोटमध्ये लिहून तिनं आयुष्य संपवलं. तिनं इमारतीतील टेरेसवरून उडी घेत आयुष्य संपवलं.

या घटनेनंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. तसेच शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवले. प्राथमिक माहितीनुसार, मृत तरूणी मागील काह दिवसांपासून याच इमारतीमध्ये वास्तव्यास होती. या घटनेनंतर परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणले असून, सध्या पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vidhyanand Bapat: गणेशोत्सवाला विरोध नाहीच, हल्ल्यानंतर विद्यानंद बापट यांची पहिली प्रतिक्रिया, कोणकोणत्या मुद्द्यावर काय म्हणाले?

Maharashtra News Live Update: अमरावती शहरातील 17 वर्षीय अल्पवयीन तरुणीची हत्या

Dahi Handi 2026: दहीहंडी फोडण्याची परंपरा कधीपासून सुरू झाली? गोविंदा मानवी मनोरे का रचतात? इतिहास जाणून घ्या

GDS Bharti 2026: १० वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; लगेच जाणून घ्या प्रोसेस

280 निवडणुका लढवणाऱ्या ज्येष्ठ नेत्याचं निधन; इंदिरा गांधींपासून वाजपेयी-आडवाणींपर्यंत दिग्गजांविरोधात दिली होती लढत, राजकारणात शोककळा

SCROLL FOR NEXT