pune news  Saam tv
मुंबई/पुणे

Pune Crime News: पुणे हादरलं! अल्पवयीन कर्णबधीर मुलीवर तिचा भाऊ आणि मित्रांकडून वारंवार अत्याचार

pune latest crime news: पुण्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यात कर्णबधीर मुलीवर तिच्याच भाऊ आणि मित्रांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

अक्षय बडवे, पुणे

Pune Crime news:

पुण्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यात कर्णबधीर मुलीवर तिच्याच भाऊ आणि मित्रांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

पोलिसांत तक्रार दाखल

पुण्यातील मुंढवा पोलीस स्टेशनच्या परिसरातून खळबळजनक घटना समोर आली आहे. १७ वर्षीय मुलीवर भावासह तिघांनी वारंवार बलात्कार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. कर्णबधीर मुलीने शाळेतील शिक्षिकेकडे याबाबत तक्रार केल्यानंतर सर्व प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

याप्रकरणी एका कर्णबधीर शाळेच्या शिक्षिकेने पोलिसांत तक्रार दिली आहे. शिक्षिकेच्या तक्रारीनंतर सागर , राहुल या दोघांसह तिच्या भावाविरुद्ध बलात्कार, पॉक्सो, विनयभंग आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडिता तरुणीवर ५ वर्षांपासून अत्याचार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीवर गेल्या ५ वर्षांपासून अत्याचार सुरू होता. पीडित तरुणी ही १७ वर्षांची आहे. ती कर्णबधीर आहे. आरोपी सागर हा तरुणीचा भाऊ आहे. त्याने बहीण कर्णबधीर असल्याचा अनेक वेळा गैरफायदा घेतला. त्याने अनेक वेळा घरी येऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

एवढ्यावरच न थांबता त्याने तिला मारहाण करीत कोणाला काही सांगितले, तर मारून टाकण्याची धमकी दिली होती. तसेच, आरोपी राहुल याने तिच्याशी लग्न करण्याचे आमिष दाखवत अत्याचार केल्याचे समोर आले आहे. हा सगळा प्रकार अखेर पीडित तरुणीने तिच्या शाळेतील शिक्षक यांना सांगितल्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पोलिसांनी अधिक तपास सुरु केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Home Cleaning Tips: दिवाळीसाठी घराची साफसफाई करायची आहे? मग, वेळ आणि मेहनत वाचवणाऱ्या ७ सोप्या टिप्स नकी फॉलो करा

Maharashtra News Live Update: कर्जतच्या टोरंट प्रकल्पाविरोधात शेकाप आक्रमक; वृक्षतोड थांबवण्याची मागणी

३-४ महिन्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील, गणेश नाईकांच्या विधानाचा नेमका अर्थ काय?

Smartphone Tips : मोबाईल अपडेट केल्यानंतरही रीस्टार्ट का करावे? जाणून घ्या महत्त्वाचे फायदे

Gold Silver Purity : तुम्ही खरेदी केलेलं सोनं खरे की बनावट? घरच्या घरी 'या' सोप्या ट्रिकने मिनिटात करा चेक

SCROLL FOR NEXT