Pune Crime News saam tv
मुंबई/पुणे

Pune Crime News: दहावीत शिकणाऱ्या मुलीनं उचललं टोकाचं पाऊल; सातव्या मजल्यावरून उडी घेत केली आत्महत्या, कारण काय?

Pune News: बुधवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास इमारतीच्या सातव्या मजल्यावरून खाली उडी मारली.

Ruchika Jadhav

दिलीप कांबळे

Maval News:

मावळमध्ये दहावीत शिकणाऱ्या मुलीने सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केलीये. ही घटना बुधवारी रात्री सव्वादहा वाजताच्या सुमारास देहू येथे घडली आहे. आर्या असं आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. ती देहुतील अभिलाषा हाऊसिंग सोसायटीमध्ये राहत होती. (Latest Marathi News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आर्या सावंत इयत्ता दहावीमध्ये शिकत होती. तिने बुधवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास इमारतीच्या सातव्या मजल्यावरून खाली उडी मारली. हा प्रकार लक्षात येताच तिच्या घरच्यांनी तिला रुग्णालय दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. आर्याच्या या आत्महत्ये मुळे मावळच्या पंचक्रोशीत दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेत देवरे पोलीस अधिक तपास करतायत.

दहावीची परीक्षा म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात मोठी परीक्षा असते. अशात आपली मुलगी देखील दहावीत चांगल्या गुणांनी पास होणार आणि भविष्याची वाटचाल चालणार असा विचार तिचे आई वडील करत होते. मात्र अचानक पोटच्या मुलीने असा निर्णय घेतल्याने आई वडिलांनी टाहो फोडला आहे.

लेक आपल्याला अशा पद्धतीने सोडून जाईल याचा त्यांनी कधी विचारही केला नव्हता. सदर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मुलीने आत्महत्या नेमकी का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. १० वी च्या अभ्यासाचा ताण असल्याने तिने असं पाऊल उचललं असावं असा अंदाज व्यक्त केला जातोय. पोलीस अधिक तपास करून तरुणीने आत्महत्या का केली याचं कारण शोधत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election : अबब! राज्यात पैशांचा महापूर, आचारसंहितामध्ये आतापर्यंत ५३६ कोटींची मालमत्ता जप्त!

Marathi Actress: फोटोतील या चिमुकलीला ओळखलंत का? आहे मराठी मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री

Shadashtak Yog 2024: शुक्र-मंगळाच्या युतीने बनला षडाष्टक राजयोग; 'या' राशी होणार श्रीमंत, करियरमध्येही होणार प्रगती

Success Story: परदेशात शिक्षण,Microsoft ची लाखोंच्या पगाराची नोकरी सोडली, ४० व्या वर्षी उभारली १२००० कोटींची कंपनी

Central Railway: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! मतदारांसाठी विशेष लोकल धावणार, वेळ काय? जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT