Pune Crime News Saamtv
मुंबई/पुणे

Pune Crime: MPSC पास तरुणीचा सडलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह! पुण्यात खळबळ; ८ दिवसांपासून...

या तरुणीची नुकतीच वन परिक्षेत्र अधिकारीपदी निवड झाल्याचेही समोर आले आहे.

Prachee kulkarni

Pune Rajgad Fort Crime: पुणे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील वेल्हा तालुक्यातील राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी तरुणीचा मृतदेह आढळ्याने खळबळ उडाली आहे. दर्शना दत्तू पवार असे या मृत तरुणीच नाव असून ती नुकतीच एमपीएससी परिक्षेत पास झाली असून तिची वन परिक्षेत्र अधिकारीपदी निवड झाल्याचेही समोर आले आहे. (Pune Latest News)

याबाबत अधिक माहिती अशी की, राजगड (Rajgad) किल्ल्याच्या पायथ्याशी आढळला तरुणीचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. दर्शना दत्तू पवार असे या तरुणीच नाव असून ती ८ दिवसांपासून बेपत्ता होती. तसेच ती हरवल्याची तक्रार १५ जून रोजी नऱ्हे आणि सिंहगड रोड पोलिस स्टेशनमध्ये देण्यात आली होती.

मात्र, आज सकाळी राजगडच्या पायथ्याशी तिचा मृतदेह आढळला आहे. वेल्हे तालुक्यात असणाऱ्या राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या सतीचा माळ या परिसरात हा मृतदेह सापडला आहे. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे. (Pune Crime News)

या तरुणीचा खून झाल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला असून ८ दिवसांपुर्वी ही हत्या झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मृतदेहाशेजारी सापडलेल्या काही वस्तूंवरुन या तरुणीची ओळख पटवण्यात आली आहे. एमपीएससी(MPCS) पास झालेल्या तरुणीचा असा संशयास्पद मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कल्याण जवळील गांधारी नदीत तरुण बुडाला

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर राज ठाकरेंच्या निकटवर्तीयाचा भीषण अपघात, मनसे नेत्याच्या फॉर्च्युनरचा चक्काचूर

Shocking : संतापजनक! आई-वडिलांच्या मृत्यूनंतर २ मुलींना काकाने विकले, नराधमांनी वर्षभर बलात्कार केला, व्हिडिओ सोशल मीडियावर केले अपलोड

Fort In Mumbai : मुंबईच्या इतिहासाचा साक्षीदार, वांद्रेपासून हाकेच्या अंतरावर वसलाय 'हा' किल्ला

Petrol- Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका, ७ दिवसात काय काय महागले?

SCROLL FOR NEXT